लाभार्थी विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे; महसूल विभागाचे आवाहन
वार्ताहर
संगमनेर तालुक्यात काल दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी १५ ते १८ वयोगटातील १४९१ लाभार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
या वयोगटातील सुमारे ३७ हजार ८९९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे टार्गेट महसूल विभागाने ठेवले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. त्याचा लाभ १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना होत आहे. संगमनेर तालुक्यात ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे.
दिनांक ३ जानेवारी रोजी संगमनेर तालुक्यातील बोटा, आश्वी खुर्द, धांदरफळ, घारगाव, जवळे कडलग, निमगाव जाळी, निमोण, तळेगाव येथील महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यालया मधून १४९१ लाभार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
तसेच यूपीएचसी ओहरा कॉलेज, साकुर ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे सुद्धा लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या वयोगटातील लाभार्थी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
