संगमनेर मध्ये सायक्लोथॉन फेरी संपन्न 

मेडिकव्हर हॉस्पिटलचा उपक्रम

प्रतिनिधी   —

जागतिक हृदय दिनाच्या (२९ सप्टेंबर) निमित्ताने मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने भव्य सायक्लोथॉन फेरी पार पडली. यामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांनी सहभाग नोंदवला. उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये तरुण युवक युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.आजची तरुण पिढी आरोग्याबद्दल खूपच जागरूक असल्याचे आढळून आले.

 

सायकलोथॉन ची सुरुवात संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल येथून दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी सात वाजता झाली. संगमनेर मधील अनेक नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.आपले हृदय आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी सायकल प्रवास गरजेचा आहे. असा संदेश सर्वत्र देण्यात आला.

 

मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर येथे सर्वांना टी-शर्ट आणि कॅप चे वाटप झाल्यावर हॉस्पिटलचे सेंटरहेड संजय समांता यांनी सहभागी लोकांचे स्वागत करून सायकल फेरी ची सुरुवात केली.

 

यामध्ये मुख्य आकर्षण स्पेन मध्ये “आयर्न मॅन” म्हणून गौरव मिळालेले डॉ. संजय विखे, उद्योजक करण राजपाल आणि अमर  नाईकवाडी, यासह IMA चे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र घुले, निमा चे अध्यक्ष डॉ. सुभाष मंडलिक, संगमनेर सायकल असोसिएशनचे  अध्यक्ष राजेंद्र गुंजाळ तसेच रोटरी क्लब संगमनेर चे अध्यक्ष ऋषिकेश मोंढे, सेक्रेटरी आनंद हासे हे उपस्थित होते.

 

सायक्लोथॉन फेरीची सुरुवात मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर येथुन होऊन अकोले नाका पासून मेन रोड, दिल्ली नाका ते अमृतवाहिनी कॉलेज, घुलेवाडी हुन पुन्हा मेडिकव्हर हॉस्पिटल अशा पद्धतीने झाली.

 

सायक्लोथॉन फेरीमध्ये सहभागी लोकांना हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिरामधे तपासणी करण्यात आली. संगमनेर मधील खूप लोकांचा हॉस्पिटलमधील विविध कार्यक्रमास  मोठ्या प्रमाणात  सहभाग असतो.

सर्वांचे आभार मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड संजोय समांता, डॉ.सुशांत गिते कार्डिओलॉजिस्ट, डॉ. चेतन जैन, डॉ. संदीप बोरले, डॉ. प्रमोद गांगुर्डे, डॉ. शिवम गुप्ता, डॉ.कैलास मांडे तसेच मार्केटिंग मॅनेजर दिपक जाधव, योगेश चौधरी, दिपक तवर, सुशील टोकासे, चेतन ठाकूर, संजय व्यास, मुक्तार शेख, योगेश मुर्तडक, श्रीकृष्ण चंदनकर,संतोष गोडसे आणि हॉस्पिटल स्टाफने आभार व्यक्त केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!