संगमनेर बाजार समितीत व्यापाऱ्याच्या नातेवाईकाची गुंडगिरी ; 

शेतकऱ्याला मारहाण – शेतकऱ्यांचे दोन तास गेट बंद आंदोलन !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत पिकअप गाडी पुढे-मागे घेण्याच्या कारणावरून तालुक्यातील रणखांब येथील शेतकरी किरण बारवे यांना बाजार समितीमधील एका व्यापाऱ्याच्या नातेवाईकांन मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दोन तास बाजार समितीचे गेट बंद करत आंदोलन केले.

जोपर्यंत त्या व्यक्तीला अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. दरम्यान पोलिसांनी व्यापाऱ्याच्या नातेवाईक अरबाल आयुब पठाण

याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्याची सुरुवात केली असता तो पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन तासानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार यांना मिळतात त्यांनीही घटनास्थळी धाव घेत बाजार समितीसह व्यापाऱ्यांना जाब विचारला. शेतकऱ्यांच्या जीवावर मोठ्या होणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अशाप्रकारे अन्याय करणाऱ्यांना व दादागिरी करणाऱ्यांना शिवसेना स्टाईल जाब विचारला जाईल असा इशारा पवार यांनी दिला. युवा सेनेचे कार्यकर्ते गुलाब भोसले, रणजित ढेरंगे, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार हे देखील यावेळी घटनास्थळी होते घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

अरबाल पठाण याच्या वर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणायत आआले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, बाळासाहेब यादव, पोलीस कर्मचारी सचिन उगले, राजेंद्र डोंगरे, आदींनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र जोपर्यंत संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन पाठीमागे न घेण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत संबंधित पठाण नामक व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विना परवाना व्यापारी माल भरत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर लवकरच शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिले. या आंदोलनामुळे दोन तास संगमनेर शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. बाजार समितीच्या गेटवरच आंदोलन झाल्याने तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाच्या गाड्या बराच वेळ गेट वरच खोळंबल्या होत्या.

अखेर संगमनेर शहर पोलिसांनी पठाण याच्यावरती संगमनेर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल असे आश्वासन संगमनेर शहर पोलिसांनी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. दरम्यान या शेतकऱ्याला मारहाण होऊनही बराच वेळ झाला तरी बाजार समितीचे पदाधिकारी गेटवर न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या गेट बंद आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीचा बराच वेळ खोळंबा झाला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!