“पीएफआय” या इस्लामिक संघटनेचा अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुख मौलाना पोलिसांच्या ताब्यात !
प्रतिनिधी —
प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पीएफआय (PFI) या इस्लामिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संगमनेर च्या स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलेली आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कुठलाही मोठा गुन्हा दाखल झाला नसून प्रतिबंधक कारवाईचा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित व्यक्ती ही मौलाना म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

पोलीस उप अधीक्षक राहुल मदने व पथकाने आज पहाटे या संदर्भात ही कार्यवाही केल्याने सोशल मीडिया मधून या चर्चेला उधाण आले होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या इस्लामी संघटनेत कार्यरत असलेल्या अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुख म्हणून संबंधित मौलानाल संगमनेर खुर्द मधून पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक पोलिसांनी या मौलानाविरुद्ध १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्कामक कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सध्या “पीएफआय” या इस्लामी संघटने विरोधात देशभर कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, नाशिक, बीड जिल्ह्यात सुद्धा या संदर्भाने कारवाया झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात या संदर्भात कुठलीही कारवाई अद्याप पर्यंत झालेली नव्हती. परंतु आज पहाटे या संघटनेशी निगडित उत्तर नगर जिल्हा प्रमुख असणाऱ्या मौलानाला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

