मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी ! 

संगमनेर तालुका पोलिसांनी दोघांना केली अटक

प्रतिनिधी —

मारुती स्विफ्ट कार मरून गोवंश मांसाची विक्री करण्यासाठी जाणाऱ्या तस्करांच्या गाडीला अपघात झाल्याने ही तस्करी उघड झाली असून संगमनेर तालुका पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. तर एकजण पसार आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एका स्विफ्ट कार सह ५०० किलो गोवंश मांस जप्त केले आहे.

मुन्ना असलम सय्यद (वय २४ रा. वार्ड नंबर २ ता, श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) सलमान इरफान शेख (वय २४ रा. वार्ड नंबर २ श्रीरामपूर हल्ली रा. कुरण, ता. संगमनेर) एजाज कुरेशी (रा. वार्ड नंबर २ ता. श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निमोण शिवारात लोणी ते नांदूर शिंगोटे रोडवर ऐश्वर्या हॉटेल सध्या बंद अवस्थेत असलेल्या ठिकाणी स्विफ्ट कार नंबर एम एच 15 सीएम 36 88 मधून गोवंश मांस विक्रीसाठी वाहतूक करीत असताना रात्रीच्या वेळी एका ट्रॅक्टरशी या गाडीची धडक झाल्याने या स्विफ्ट कार मधून गोवंश मांस वाहतूक होत असल्याचे उघड झाले. संगमनेर तालुका पोलीस त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांनी गाडीसह मांस जप्त केले व दोघांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

संगमनेर तालुका पोलिसांना या ठिकाणी ५०० किलो गोमांस या गाडीतून जप्त केले. त्यावेळी मुन्ना आणि सलमान हे दोन आरोपी गाडीमध्ये आढळून आले. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी कार सह सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस नाईक अनिल पोपट जाधव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार आर ए पठाण हे करत आहेत.

गोवंश मांस तस्करीचे नवे केंद्र कुरण ?

संगमनेर शहरात गोवंश हत्या आणि बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचे नेहमीच उघडकीस आले आहे. पण त्याचवेळी संगमनेर शहरातील ग्रामीण भागात कुरण येथून देखील संशयास्पद रित्या व गोवंश हत्या आणि जनावरांची तस्करी केली जात असल्याचे माहिती समजली आहे. त्यामुळे पोलिसांनी कुरण येथील देखील गोवंश मांसाची व जनावरांची अवैध तस्करी करणाऱ्यां विरोधात कारवाई करायला हवी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!