संगमनेरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आमरण उपोषण

मटका, गांजा, जुगार अड्डे बंद कधी होणार ?

प्रतिनिधी —

 

संगमनेर शहर व तालुक्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांवर ताबडतोब कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आज पासून संगमनेर प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे सर्वत्र फोफावल्या ने नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. यामध्ये गांजा, अवैद्य कत्तलखाने, गोमांस, जुगार, मटका अड्डे, वेश्याव्यवसाय, वाळू तस्करी, अवैध दारू विक्री, गुटखा, ऑनलाईन लॉटरी असे विविध अवैध धंदे सुरू असून पोलीस प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. अनेक वेळा निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

त्यामुळे आज (दिनांक २४, मंगळवार) पासून संगमनेर प्रांत अधकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात शौकत पठाण, विशाल सोनवणे, अकील पठाण, जमीर शेख, बानो बी शेख, आरती सोनवणे, सविता भालेराव, सविता दिघे हे सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!