ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य मंदिर व्हावे – डॉ.जयश्री थोरात

जवळेकडलग व तळेगाव दिघे येथील भेट व आरोग्य सेविकांशी संवाद
प्रतिनिधी —
ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यंत चांगल्या व अद्यावत आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ही या नागरिकांसाठी आरोग्य मंदिर ठरावे यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ.जयश्री थोरात यांनी केली.

जवळेकडलग व तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.जयश्री थोरात यांनी भेट देऊन तेथील आरोग्यसेविका, नर्स,अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याशी संवाद साधला. यावेळी समवेत इंद्रजीत थोरात, जि.प. सदस्य रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटंळ, गरूड सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र कडलग, तळेगावचे सरपंच बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जवळे कडलगचे उपसरपंच निलेश कडलग, माजी सरपंच कैलास देशमुख, डॉ.नंदकर, पंकज नाईकवाडी, प्रसाद कडलग, सौरभ कडलग, डॉ.धामसे, डॉ.माने आदिंसह गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

थोरात म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटानंतर प्रत्येक माणसाला आरोग्याचे महत्त्व समजले आहे. धावपळीच्या व्यस्त दिनक्रमातूनही स्वतःच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे. कुटुंबाच्या आरोग्यामध्ये महिलांचे आरोग्य चांगले राहणे अत्यंत गरजेचे आहे. तालुक्यातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी कोरोना संकटात अत्यंत चांगले काम केले आहे. यापुढेही आपल्याला प्रत्येक कुटुंब हे निरोगी व सुदृढ बनवायचे आहे. यासाठी प्रत्येकीने मिशन निरोगी कुटुंब अंतर्गत काम करावे.
यावेळी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब कांदळकर यांनी आभार प्रदर्शन केले
