चौपदरीकरण रस्ता संगमनेर शहराचे वैभव ठरणार–

आमदार डॉ. सुधीर तांबे

चौपदरीकरण रस्त्यावरील डांबरीकरण कामांचा शुभारंभ

प्रतिनिधी–

संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरणा सह संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मोठा निधी मिळवला असून या नव्या रस्त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून हा रस्ता हायटेक व शहराचे वैभव ठरणार असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले आहेत.

संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक – पुणे नव्या चौपदरीकरण महामार्गावरील डांबरीकरण कामांचा शुभारंभ ऑरेंज कॉर्नर येथे आमदार डॉ. तांबे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिर्डी संस्थानचे विश्वस्त ॲड. सुहास आहेर, गजेंद्र अभंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील, उपअभियंता सौरभ पाटील, डि.एम.लांडगे, अरुण ताजणे, मातेरे कंपनीचे प्रतिनिधी धापटकर आदी उपस्थित होते.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक दरम्यान या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या रस्त्याच्या दुतर्फा नागरिक व विद्यार्थ्यांसाठी पादचारी मार्ग असून मध्ये डिव्हायडर सह सुशोभिकरण केले जाणार आहे. या संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूने साईड गटारांचे काम अत्यंत वेगाने सुरू असून सर्व ठिकाणी खोदाई काम करून त्यावर खडीकरण, मुरमीकरण व डांबरीकरण असे विविध लेअर चे काम केलेले आहे.

उप रस्त्यांच्या कामांसाठीही सुविधा केली आहे. याच बरोबर घुलेवाडी फाटा येथे असलेली उंच टेकडी कमी केली असून  रस्त्यांमध्ये समानता आणण्यासाठी काम केले जात आहे. अत्यंत गुणवत्तेने होणाऱ्या या कामामुळे संगमनेर शहराचे वैभव वाढणार आहे.

डॉ. तांबे म्हणाले की, कोरोणाच्या संकटानंतर संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे संगमनेर शहराचे मोठे वैभव वाढणार असून तालुक्यात विविध ठिकाणी मोठमोठी विकास कामे सुरू आहेत. याच बरोबर महामार्गावर  घुलेवाडी येथील माझे घर सोसायटी जवळ उड्डाणपुलाचे कामही करण्यात येणार आहे. तलाव दुरुस्ती, आदिवासी वाडी विकासा करीता मोठा निधी मिळवला आहे. हा सातत्याचा विकासकामांचा वेग यापुढेही कायम राहील असे ते म्हणाले .

१५०० वृक्षांचे रोपण व संगोपन करणार

नाशिक पुणे हायवे दरम्यान काही वृक्ष मध्ये आल्याने ते काढावे लागले असल्याने रस्त्याच्या दुतर्फा विविध ठिकाणी पंधराशे वृक्षांचे रोपण करून हरित शहरात सहभाग दिला जाईल.

RRAJA VARAT

One thought on “चौपदरीकरण रस्ता संगमनेर शहराचे वैभव ठरणार — आमदार डॉ. सुधीर तांबे”
  1. चारपदरी रस्ता व संगमनेर जिल्हा निर्मिती पण गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!