राजूर पोलिसांचे दारू आणि मटका अड्ड्यांवर छापे !
सात जणांवर गुन्हे दाखल

प्रतिनिधी —
राजूर पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध ठिकाणी छापे घालून अवैध दारु विक्री करणारे आणि मटका अड्ड्यावर कायदेशीर कारवाई केली. राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील चार गावांमध्ये दारू अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले असून राजुर गावात एक दारू अड्डा आणि एका मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे.

या छाप्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आल्या असून ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी काहींना अटक करण्यात आली आहे.
राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना राजुर गावात दिगंबर रोड येथे राहुल अदालतनाथ शुक्ला हा अवैध देशी दारुची विक्री करत आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता साबळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी घराच्या आडोशाला अवैध दारु विक्री करताना मिळुन आल्याने त्याची झडती घेतली व १८०० रुपये किंमतीच्या बॉबी संत्रा कंपणीची देशी दारु ३० बाटल्या जप्त केल्या. आरोपी राहुल अदालतनाथ शुक्ला (रा.राहुलनगर,राजुर ता.अकोले) यास अटक केली आहे.

तसेच कोल्हार घोटी रोडवर कातळापुर बस स्टँन्ड जवळ हिरो होंडा मोटर सायकल वरून अवैध दारू विक्री करणारे निलेश जयराम बिडवे, शरद दगडू शिंदे, (रा. कातळापूर) या दोघांची झडती घेतली असता ५७६० रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपणीच्या देशी दारुच्या ९६ बाटल्या जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

माणिक ओझर येथे अवैध दारु विक्री करतेवेळी लताबाई लक्ष्मण बोटे हिच्या ताब्यातून ६६० रुपये किंमतीच्या बॉबी संत्रा कंपणीच्या देशी दारुच्या ११ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
मवेशी येथे महादेव मंदीराच्या आडोशाला येथे अवैध दारु विक्री करतेळी शांताराम रामा भांगरे (रा. मवेशी ता. अकोले) याचेवर छापा टाकला असता तो मुद्देमाल टाकुण पळुन गेला. त्याने टाकलेल्या पिशवीत खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला. ९६० रुपये किंमतीच्या बॉबी संत्रा कंपणीच्या देशी दारुच्या १६ बाटल्या.

राजुर ग्रामपंचायत जवळ भिंतीच्या आडोशाला अवैध कल्याण मटका खेळतेवेळी तान्हाजी निवृत्ती लोहरे(वय-४० वर्षे,रा. माळेगाव), भाऊसाहेब दुंदा देशमुख (वय-३७ वर्षे, रा. देशमुखवाडी, केळुंगण) यांना पकडण्यात आले असून ६४० रुपये रोख रक्कम व मटका खेळण्याचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
