संगमनेरात पुन्हा १२०० किलो गोवंश मांस पकडले ! 

गोवंश हत्या थांबणार कधी ?

प्रतिनिधी —

पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांना संगमनेरातून गोवंश मांसाची वाहतूक होणार आहे याची गुप्त खबर मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने सापळा रचून संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात आज पहाटे एका पिकअप जीप सह १२०० किलो गोवंश जनावरांचे मांस पकडलेआहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. गोवंश मांसासह सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संगमनेरात पुन्हा गोवंश जनावरांच्या मांसाची वाहतूक होत असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मोसिन अन्वर कुरेशी (वय ३१ वर्षे, रा. भारत नगर, संगमनेर) आणि तोसिफ ताहीर कुरेशी रा. भारतनगर, संगमनेर) असे दोन्ही आरोपीचे नाव आहे.

संगमनेर मधून एक पांढऱ्या रंगाची  पिकअप जीप (एमएच १४ डीएम ८३७५) गोवंश मांस घेऊन वडगावपान शिवारातून कोपरगाव कडे जाणार असल्याचे पोलिसांना समजले. पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने वडगावपान शिवारात मोरे विद्यालयाजवळ सापळा रचून पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही जीप पकडली.

या जीपमध्ये भुश्याच्या गोण्या खाली गोमांस लपवून वाहतूक करीत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर गाडी आणि गोवंश मांस ताब्यात घेण्यात आले.

पोलीस नाईक अण्णासाहेब किसन दातीर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पिकअप जीपचालक मोसिन कुरेशी याला अटक करण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!