संगमनेर शहरातील झुंजुर वाड्यात मटका- जुगार अड्ड्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा !

१२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी —
श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकाने संगमनेर शहरात जुगार आणि मटका अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेर शहरात विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने मटका अड्ड्यांवर केलेली कारवाई हा शहरात चर्चेचा विषय असताना त्याच वेळी श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने शहरातील झुंझुर वाडा, देवी गल्ली येथे छापा टाकून जुगार आणि मटका खेळणारे आणि हा धंदा चालवणारे अशा १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेरात एकाच दिवशी विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि संगमनेर शहर पोलिस स्टेशन यांनी अवैध धंद्यांवर कारवाई केली असल्याने एकच खळबळ उडालेली आहे.
विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई सुरू झाल्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्या कडून देखील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवाईत मटका आणि जुगार हा अवैध धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे आढळून आलेले आहे.

संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध झुंजुर वाडा, देवी गल्ली या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला.
दिलीप रघुनाथ ढगे, रवींद्र श्रीधर रूपवते, अफजलखान अन्सार पठाण, सुनील दामू गायकवाड, राहुल मच्छिंद्र मुसळे, घनश्याम रमेश जेधे, युसूफ मिठूभाई सय्यद, सुरेश गंगाधर झोळेकर, वाहिद अजीज पठाण, सय्यद मुस्ताक फकीर मोहम्मद, सोमनाथ सुखदेव गोर्डे, हौशीराम नारायण बांगर अशा बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मनोज अमृत खजुरे आणि राहुल खिराजी सडमाखी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या ठिकाणी पोलिसांनी ४९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या पथकातील प्रमोद शांतवन जाधव यांनी यासंदर्भात फिर्याद दिलेली आहे.
