महिला दिनानिमित्त वृक्षारोपण ; बालपण (पानोडी) स्कूल चा उपक्रम
प्रतिनिधी —

आज जागतिक महिला दिनानिमित्त बालपण स्कूलच्या शिका आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत वृक्षारोपण केले असून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली आहे.
महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. शिक्षणापासून, खेळापासून मनोरंनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल आता सर्व पातळीवर घेतली जात आहे.

जागतिक महिला दिनी सह्याद्री देवराईचे प्रमूख सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व अलकाताईंनी केलेल्या आवाहणास प्रतिसाद देत शाळेत उभारलेल्या सह्याद्री देवराईत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाढदिवसातून बहरलेल्या देवराईत नवीन वृक्षारोपण, व संगोपन केलेल्या झाडांची मशागत करत आळे बनवणे, खुरपणी करणे, झाडांना माती लावणे, पाणी देणे व प्रत्येक वृक्ष त्याची माहिती दिली.

बालपण च्या सर्व महिला शिक्षिकांनी व विद्यार्थ्यीनींनी महिलेच्या वेशभूषेत आज आगळ्यावेगळ्या पध्दतीने महिला दिन साजरा केला व बालपण च्या सर्व ज्ञान देणा-या महिला शिक्षिकेची वृक्ष भेट देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व महिला शिक्षकांचे शाळेच्या आवारातील फुलांपासून गुच्छ बनवून देत स्वागत केले. बालपण च्या महिला शिक्षिकांनी महिला दिनी विद्यार्थ्यांसाठी भारत देशाची अस्मिता राजमाता जिजाऊ साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, अंतराळवीर महिला कल्पना चावला या महिलांच्या योगदानाबद्दल व प्रेरणा मिळावी म्हणून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.

यासाठी बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे, बालोटे, साबळे, संत, घोडके, बोऱ्हाडे, पवार, आव्हाड, शिंदे या महिला शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.
