अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एआयसीटीईची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी —
देशपातळीवर आपल्या गुणवत्तेतून नावलौकिक निर्माण करणाऱ्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, भारतीय सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि अमृतवाहिनी च्या संयुक्त विद्यमाने झालेल्या “आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ट कंडिशन ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम” ही राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. वेंकटेश यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. वेंकटेश म्हणाले की, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व भारतीय सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या वतीने अभियांत्रिकी क्षेत्रात नवीन रिसर्च साठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेज मधील इलेक्ट्रिकल विभागाच्यावतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ट कंडीशन मॉनिटरिंग ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम या विषयावरील इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन एआयसीटीई चे संचालक डॉ. कर्नल बी. व्यंकटेश, अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून स्वायत्त वाहतूक, शिक्षण व आरोग्य, पर्यावरण सेवा, स्मार्ट ग्रीन, ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी इन पावर सिस्टीम, पॉवर जनरेशन, स्वच्छता व सुरक्षा यासारख्या विविध यंत्रणा जोडून एकात्मिक परिणामासाठी संशोधन करणे याकरिता या चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेमधून कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील मूलभूत संकल्पनांची ओळख आणि त्यातील लॉजिक अल्गोरिथम यासारखे आवश्यक बाबींची माहिती, प्रात्यक्षिक, अनुप्रयोग याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याकरिता विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व तज्ञ मार्गदर्शन निमंत्रित करण्यात आले होते. यासाठी भारतीय सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी अर्थसाह्य केले.

या यशस्वी कार्यशाळेबद्दल विश्वस्त शरयू देशमुख, इंद्रजित थोरात, बाजीराव खेमनर,लक्ष्मणराव कुटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी कौतुक केले असून या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून विभाग प्रमुख डॉ. सुनिल कडलग यांनी व डॉ. किशोर भदाणे यांनी काम पाहिले.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विद्युत विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
