संगमनेरचा ‘मुळशी पॅटर्न !
प्रतिनिधी —

‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात शेतकऱ्यांच्या जमिनी दादागिरी करून, दमदाटी करून, हाणामाऱ्या, खून, अपहरण करून खरेदी करायच्या त्यावर मोठमोठ्या इमारती, बिल्डींग, मॉल उभे करायचे आणि त्यातून कोट्यावधी रुपये गोळा करायचे. हे सगळे करण्यासाठी मोठमोठ्या बिल्डर्सकडून, कॉन्ट्रॅक्टर्स, पुढाऱ्यांकडून गुंडांच्या टोळ्यांचा वापर केला जात असे. या टोळ्यांमधले आपापसातले टोळीयुद्ध आणि पोलिसांनी संपवलेल्या या टोळ्या असा प्रकार साधारण या चित्रपटात दाखवलेला आहे. त्याला ‘मुळशी पॅटर्न’ संबोधले जाते.

संगमनेरात देखील एक मुळशी पॅटर्न आहे. पण संगमनेरचा मुळशी पॅटर्न हा जरा ‘गोडबोल्या’ आहे. या ठिकाणी हाणामाऱ्या, खंडण्या, अपहरण, वसूली सहसा असे प्रकार न करता पोलीस, प्रशासन, विविध खात्यातील अधिकारी हाताशी धरून, पैशांचा वापर करून एक वेगळाच मुळशी पॅटर्न राबविला जात असल्याचे बोलले जात आहे.

संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या दोन-चार जिल्ह्यापेक्षा संगमनेरच्या जमिनींना सोन्याचे भाव आलेले आहेत. त्यामुळे येथे सुद्धा खरेदी-विक्री जमिनीच्या देवाण-घेवाण याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हे काम करणाऱ्या टोळ्या देखील येथे निर्माण झाल्या आहेत.

मात्र या टोळ्या गुंडांच्या टोळ्या नसून शुभ्र, स्वच्छ, भरजरी कपड्यातल्या व्यापारी, उद्योगपती, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, राजकीय पुढारी, नेते, पदाधिकारी, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध राजकीय संलग्न असणाऱ्या संस्थांमधील पदाधिकारी, अधिकारी यांच्या असल्याचे दिसून येत आहेत.
संगमनेर तालुका नगर जिल्हा नव्हे तर आता महाराष्ट्राबाहेर देखील उत्तरेकडे संगमनेरी मुळशी पॅटर्नच्या टोळीने काम सुरू केलेले आहे. या टोळ्यांकडून मोठ्या श्रीमंत धनाढ्य लोकांचे, राजकीय नेत्यांचे पुढाऱ्यांचे “काळ्याचे पांढरे” करण्याचे काम देखील केले जाते.

राजकारणात एकमेकांचे कितीही वैरी असले तरी ‘संगमनेरी मुळशी पॅटर्न’ राबवताना मात्र हे सगळे एकमेकांचे ‘सगेसोयरे’ असल्यासारखे वागताना आणि धंदा करताना अनेक कागदपत्रांमधून दिसून येतात.
संगमनेर शहर आणि तालुक्यात जमिनीला आलेला सोन्याचा भाव यास कारण आहे. यामध्ये धाडस करून, संबंधित विभागाला हाताशी धरून सरकारच्या बक्षीस दिलेल्या जमिनी, हाडकी हाडवळा जमिनी, गायरान जमिनी, दलित, आदिवासी यांना मिळालेल्या शासनाच्या जमिनी, वन विभागाच्या जमिनी डोंगर, नद्यांचे दोन्ही बाजूचे तीर (काठ) लुटण्याचे प्रकार या टोळ्यांकडून केले जात आहेत.

कुणाशीही भांडण न करता पैशाचा वापर करीत जमिनीच्या संबंधातील सर्व यंत्रणेला हाताशी धरून अशा अनेक कोट्यावधी रुपयाच्या जमिनींची खरेदी विक्री व्यवहार या संगमनेरी मुळशी पॅटर्न मधून होत आहे. संगमनेरात जमिनींच्या खरेदी विक्रीचे असे अनेक व्यवहार आहेत. ज्यांचे प्रत्यक्षात एकमेका शत्रुत्व दिसते. मात्र जमिनीच्या उताऱ्यावर या सगळ्याची एकत्रित नावे दिसतात. ही आश्चर्यकारक बाब फक्त संगमनेरी मुळशी पॅटर्न मध्ये पाहण्यास मिळते.

टोळ्यातील सदस्यांचे एकमेकांशी आतून चांगले सूत जमलेले असते. “संगमनेरी मुळशी पॅटर्न उद्योगपती, ठेकेदार, पुढारी, आणि प्रशासन यांचा मिळून तयार झालेला पॅटर्न आहे” एकमेकाच्या विवाह समारंभात, सुखदुःखात, राजकीय कार्यक्रमात, निवडणुकात, वाढदिवसात या पॅटर्नच्या टोळ्या सोशल माध्यमातून अनेक नागरिकांना सक्रीय झालेल्या दिसून येतात.
मधल्या काळात राजकारणात आलेले काही ठेकेदार किंवा ठेकेदारीतून मिळालेली राजकीय पदे अशी मंडळी या टोळ्यांशी संलग्न झाले होते. यातून संगमनेरच काय संगमनेर च्या बाहेर देखील मोठ मोठे प्रोजेक्ट तयार झाले.

विशेषतः पुण्याकडे अनेकांचा कल होता. पुण्यात मोठ्या इमारती, कार्यालये तयार झाली. काहींचा संगमनेर पुणे असा घरोबा देखील तयार झाला. यातून पैसा, प्रसिद्धी, राजकीय पदे मिळाली. त्यातून गैरव्यवहार वाढीस लागले. आणि त्यातून अनैतिक प्रकार देखील घडू लागले.
असले अनैतिक प्रकार काही ठेकेदारांच्या, कॉन्ट्रॅक्टरच्या घरा पर्यंत पोहोचले. मधल्या काळात अतिशय सुप्रसिद्ध असलेली टोळी पुण्यात आपले उद्योग करत होती. परंतु लफडेबाजी मुळे आणि ही लफडेबाजी गुपचूप थेट घरात घुसल्या मुळे ही मुळशी पॅटर्न टोळी संगमनेरात फुटली. वादावादी झाली. यातून बरीच चर्चा घडली. आजही चर्चा सुरू आहे.

एकंदरीत पाहता संगमनेरात जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गुन्हेगारी स्वरूपाचा मुळशी पॅटर्न नसला तरी गैरप्रकारांचा, अवैध प्रकारांचा, जुगारी, दारुबाजी, लफडेबाजीचा मुळशी पॅटर्न असल्याचे बोलले जाते.
संगमनेर शहरात उभ्या राहणाऱ्या मोठ-मोठ्या इमारती, बिल्डिंग, रो हाऊसिंग सोसायट्या, बंगल्यांच्या स्कीम, फ्लॅट, प्लॉट या सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून तयार होत आहेत. रस्ते चोरणे, बांध कोरणे, शासनाच्या जमिनीत घुसणे असे प्रकार सर्रास झालेले आहेत. विशेष म्हणजे संगमनेरात “रेरा” कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन करून बेकायदेशीर कृत्ये चालू असले तरी या संगमनेरी मुळशी पॅटर्न टोळ्यांना राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही असा त्यांचा दावा आहे.

त्यामुळे भविष्यात हा ‘संगमनेरी मुळशी पॅटर्न’ कशा स्वरूपात समोर येईल ते पाहण्याची उत्सुकता आता सर्वसामान्य नागरिकांना लागलेली आहे.

It is a sign of prosperity of Political leaders, Business men, Builders, Lan developers and to large extent of land mafia.
Under the present situation considering the Union & State Governments it is impossible for common people like me it is impossible to overcome the menace.
It is good Sangamner times has taken up the issue.
Political leaders of both the major parties ie BJP & Indian National Congress should come together and work toward the development of Ahmednagar District instead of in fighting for personal gains.
These political leaders must take initiative to work together for development of Ahmednagar District and implement the regional plan for development of not only Sangamner but also Shrirampur, Kopergaon, Pravaranagar like Sharad Pawar Saheb. Sharad Pawar Saheb has developed Baramati Taluka and is a glaring example for all the political party workers.
Fortunately Sangamner is education hub since the year 1900 th century.
Now is the time to have Allopathic Medical college for studying MBBS.
Currently Russia and Ukraine are fighting war and Prime minister Modi has evacuated more than 18000 Indian and Pakistanis students and community free of charge.
Prime minister Modi has taken a decision to accomodate the evacuated Medical students to undergo Internship in India and open more Allopathic Medical facilities so that exodus of Indian going to Russia or Ukraine or USA, Canada, Germany, England and become not only self sufficient but attract foreign countries to study in India.
Vijaykumar Ganpatrao Jorwekar