शंभर टक्के महसूल वसुली साठी प्रयत्न करावेत — जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले.
संगमनेरच्या सीसीटीव्ही यंत्रणेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

प्रतिनिधी —
महसूल विभागाने तत्पर व जलद प्रशासनाचा मूलमंत्र जपत शंभर टक्के महसूल वसुली साठी प्रयत्न करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिल्या.
संगमनेर तहसील कार्यालयात डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज भेट दिली. यावेळी महसूल वसुलीबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. याप्रसंगी संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ शशिकांत मंगरूळे , पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, तहसील कार्यालयाने सुंदर माझे कार्यालय अंतर्गत केलेले सुशोभीकरण व महसूल साक्षरता दालन उल्लेखनीय असे झाले आहे.
महसूल विभागाच्या आढाव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या अद्ययावत सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट देऊन पाहणी केली.
