खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांची मोटर सायकल यात्रा आणि ‘डबा पार्टी – गोपाळकाला’!

लोणी खुर्द येथे १ कोटी १४ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ !
प्रतिनिधी —
दुचाकीवरून थेट नागरीकांच्या दारी आणि कार्यकर्त्यां समवेत डबा पार्टी आशा अनोख्या जनसंपर्क अभियानाची सुरूवात खासदर डॉॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

लोणी खुर्द येथे सुमारे १ कोटी १४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
अतिशय साधेपणा असलेल्या विखे यांनी चारचाकी वाहनांचा डामडौल टाळत दुचाकी वाहनावर बसूनच सर्व उद्घाटन असलेल्या ठिकाणी जाणे पसंत केले. यानिमित्ताने त्यांनी लोणी खुर्द गावातील प्रत्येक प्रभागातील नागरीकांशी संवाद साधला. ठिकठिकाणी सर्व नागरीक युवक महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी त्यांचे स्वागत केले. विखे यांनी सर्वाची अतिशय आस्थेने चौकशी करीत समस्याही जाणून घेतल्या.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची काम निरतंर सुरू आहेत. शासकीय योजनांचा लाभही प्रत्येक माणसापर्यत पोहचवला जातो. या योजनांची अंमलबजावणी करणारा शिर्डी मतदारसंघ राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगून केंद्र सरकारच्या योजनासाठी सुध्दा माझा पाठपुरावा असल्याचे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय वयोश्री योजनेचे खूप मोठे काम नगर जिल्ह्य़ात झाले. या योजनेत पात्र ठरलेल्या जेष्ठ नागरिकांना साधन साहीत्य वितरीत करण्याचा शुभारंभ केंद्रीय मंत्री डाॅ. विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत केला. शिर्डी मतदार संघातील साधन साहीत्य वाटपाचा शुभारंभ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवार दि.६ मार्च रोजी लोणी खुर्द येथून होणार असून टप्प्याटप्प्याने सर्वच गावात आणि इतरही तालुक्यात तारखा निश्चित करून हे कार्यक्रम होणार असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले.

दरम्यान विखे यांनी कार्यकर्त्यां समवेत डबा पार्टी आयोजित केली. त्यांनी स्वतःचा जेवण डबाही बरोबर आणला होता. कार्यकर्त्यांनाही डबे आणायला सांगितले होते. स्नेहभोजन कार्यक्रमातून सर्वाशी संवाद व्हावा कार्यकर्त्यामध्येही एकमेकां बद्दलची आत्मियता वाढावी. संवादातून स्थानिक प्रश्नासह विकासाच्या गप्पा व्हाव्यात हाच उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

