संगमनेर तालुक्यात शेतातून २५ कॅरेट डाळिंबाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर प्रतिनिधी –

तालुक्यातील जवळे कडलग परिसरातील शेतातून अज्ञात चोरट्याने सुमारे २५ कॅरेट डाळिंबाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या डाळिंबाचे अंदाजे वजन ५०० किलो असून त्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण विजय सुर्वे (वय ३५, रा. जवळे कडलग, ता. संगमनेर) यांच्या गट नंबर २१९ मधील सुमारे एक एकर क्षेत्रातील डाळिंबाच्या बागेत ही चोरी झाली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बागेतील डाळिंब संमतीशिवाय व आर्थिक फायद्याच्या उद्देशाने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणीसंगमनेर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. उगले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. शेतातून डाळिंब चोरीला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!