अवैध गुटखा व मावा विक्रेत्यांवर एलसीबीचे छापे

तीन गुन्हे दाखल ; ५ आरोपींविरुद्ध कारवाई, ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पाथर्डी शहर व परिसरात अवैध गुटखा, मावा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून एकूण ४ लाख ४५ हजार १८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांची माहिती संकलित केली. त्यानुसार २ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.

या कारवाईत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

– गुन्हा क्र. ८९५/२०२६ : अंबादास गंगाधर गिरी (रा. अकोला, ता. पाथर्डी) व आदित्य गणेश भस्करे (रा. आकरबा गल्ली, पाथर्डी) यांच्याकडून ₹१,०१,१८१ किमतीचा मुद्देमाल जप्त.

– गुन्हा क्र. ८९६/२०२६ : संतोष प्रताप ईधाटे (रा. नाथनगर, पाथर्डी) याच्याकडून ₹७७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त.

– गुन्हा क्र. ८९७/२०२६ : ओंकार राजेंद्र उधारे (रा. कसबा पेठ, पाथर्डी) याच्याकडून ₹२,६७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गणेश सुनील शिंदे हा आरोपी फरार आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच तिसऱ्या गुन्ह्यात कलम ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे पार पाडली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!