पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे….
१ तास ४५ मिनिटांत पुणे – नाशिक
नाशिक या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांपर्यंत कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

प्रतिनिधी —
पुणे-नाशिक या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांपर्यंत कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. केंद्र सरकारच्या वित्त आयोगाच्या मंजुरीनंतर ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (महारेल) या प्रकल्पातील रेल्वे स्थानकांसाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (ईओआय) मागवले आहेत.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी पुणे, नगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळणे बाकी असले, तरी या रेल्वेमार्गासाठी पुढील टप्प्यातील तयारी ‘महारेल’ने आरंभली आहे. त्याअंतर्गत या मार्गावरील सर्व स्टेशन्सचे बांधकाम, त्या लगतचा परिसर, पादचारी पूल आणि इतर सर्व अनुषंगिक कामांसाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेच्या स्टेशन बांधकाम नियमांनुसार ‘महारेल’कडून तयार होणाऱ्या आराखडा/रचनेनुसार या स्टेशनचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये पुणे स्टेशन ते हडपसर दरम्यानचा रेल्वेमार्ग पूर्णतः उन्नत स्वरूपात असल्याने या दोन्ही स्टेशनच्या रचनेवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. हे प्रस्ताव पाठविण्यासाठी पाच एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मार्च २०२१मध्ये मान्यता दिली होती. रेल्वे बोर्डानेही गेल्या वर्षी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला. या प्रकल्पासाठी एकूण १६ हजार ३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील १४५८ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

चार स्थानके वगळली
‘महारेल’ने सुरुवातीला तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प आराखड्यात (डीपीआर) पुणे आणि नाशिकसह एकूण २४ स्थानकांचा समावेश होता. मात्र, पाहणी आणि मार्गाची आखणी पूर्ण झाल्यानंतर त्यामधील चार स्थानके वगळण्यात आली. आता या मार्गांवर २० स्थानकेच असतील. पुण्यातील कोलवडी, नगरमधील जांबुत, देवठाण आणि नाशिकमधील दोडी ही स्थानके वगळली आहेत. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या स्थानकांसाठी स्वारस्य अभिव्यक्ती अहवालाची मागणी, भूसंपादनाचे काम सुरू असले, तरीही या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार समितीच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.

प्रकल्पातील स्थानके
पुणे (टर्मिनल), हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, आंबोरे, संगमनेर, निमोण, नांदुर-शिंगोटे, सिन्नर, मुढारी, वडगाव पिंगळा, नाशिक (टर्मिनल)
केंद्र, राज्याचे ३२०० कोटी रुपये
या प्रकल्पासाठी १६,०३९ कोटी रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ३२०८ कोटी रुपये आर्थिक हिस्सा देतील. ९६२४ कोटी रुपये कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहेत. कर्जाची परतफेड होईपर्यंत पुढील अकरा वर्षांच्या कालावधीत १० हजार २३८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासाठी मुद्रांक शुल्कात माफीही देण्यात आली आहे.

प्रकल्प एका दृष्टिक्षेपात
२३५ किलोमीटर प्रकल्पाचे अंतर, २०० किमी/प्रति तास रेल्वेचा अपेक्षित वेग, एक तास ४५ मिनिटे पुणे-नाशिक दरम्यान प्रवासाचा कालावधी.
मार्गावरील प्रस्तावित स्थानके २०, लहान-मोठे बोगदे १८, अंतिम परवानगीची प्रतीक्षा,
भूसंपादनाची सद्यस्थिती – तिन्ही जिल्ह्यांतील एकूण गावे १०२, मोजणी पूर्ण झालेली गावे ८५.

पुणे-नाशिक रेल्वेसाठी बहुतांश परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. आता फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर उमटल्यानंतर काम गतीने व्हावे, यासाठी स्टेशनच्या बांधकामाचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार

मी सहा किंवा सात वर्षे वयाचा असल्यापासून ऐकत आलो आहे. आता माझे वय सत्त्याहत्तरावे चालू आहे. या वेगाने रेल्वे व केंद्र आणि राज्य सरकार ह्या प्रकल्पासाठी केलेले काम बघितले कि मला नाही वाटत माझ्या हयातीत पुणे नाशिक रेल्वे लाईन टाकली जाईल. सेमी हायस्पिड रेल्वे ट्रॅक तर दूरची गोष्ट आहे.
संगमनेर टाईम्सने पुढाकार घेऊन अधिक माहिती दिली या बद्दल धन्यवाद.
रेल्वे मंत्री म्हणून महाराष्ट्रातील मराठी बरेच केंद्रीय मंत्री जसे कि दंडवते, कलमाची,पियुष गोएल व आता दानवे राज्यमंत्री आहेत.
लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना ते शिर्डीत पहिल्यांदा साईबाबा दर्शन घेण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी मनमाड शिर्डी रेल्वे मार्ग बिहार युपी आंध्रा प्रदेशात रहाणा-या यात्रेकरूंची सोय केली होती व तातडीने ते काम पुर्ण केले व उदघाटनही त्यांच्या कार्यकाळातच केले होते.
दंडवते रेल्वे मंत्री असताना त्यांनी कोकण रेल्वेची स्थापना केली व कर्जरोखे काढून पैशाची सोय केली व रेल्वे गाड्या केरळमध्ये त्रिवेंद्रम कन्याकुमारी ते जम्मु रेल्वे चालु केल्या आहेत. कोकण रेल्वे त्यांनी तयार केलेल्या मार्गावरून जाणारी प्रत्येक गाडीचे अजूनही भाडे अकारते आहे.
कोकण रेल्वेने ट्रक वॅगनवर चढवून वाहतुक कन्याकुमारी पर्यंत वाहतुक चालु केली व डिझेल कंझम्पशन मध्ये बचत केली व भारत सरकारला मदत केली आहे. श्रीधरन ज्यांनी दिल्ली मेट्रो योजना पुर्ण केली त्यांनी कोकण रेल्वे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पुर्ण केले. त्यांना नाशिक पुणे योजनेचे प्रमुख करावे. महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे सारखे नाशिक पुणे रेल्वे लाईन पुर्ण करण्यासाठी कर्जरोखे काढून योजना लवकरात लवकर पुर्ण करावी व भारतीय रेल्वेला भाड्याने देऊन कर्ज रोख्यासाठीचे कर्ज परतफेड करावी. तसेच पुणे नगर औरंगाबाद मराठवाडा रेल्वे कार्पोरेशनची स्थापना करावी व महाराष्ट्र राज्यातले सगळ्या जिल्ह्यांना रेल्वे चालु करावी.
मी स्वतः कै राहुल बजाज राज्य सभेवर निवडून आले तेव्हा त्यांनी पुढाकार घ्यावा अशी लेखी विनंती केली होती.
महाविकास आघाडी सरकारने यासाठी पहिले पाऊल टाकले पाहिजे मतदारांना खुश करावे. दानवे फार काही करतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा हा प्रश्न धसास लावला पाहिजे.
संगमनेर टाईम्सने पुढाकार घेतला पाहिजे.
मी एकटा कमी पडलो याची मला खंत वाटते
विजयकुमार गणपतराव जोर्वेकर
मोबाईल 94239 64300
70.varsh konache sarkar hote he aapanala mahit ahe.v aatta Modi he to mumkin he.
पुणे नाशिक रेल्वे मार्ग कसा आणि कुठल्या गावावरून सिटी सर्व्हे नंबर मधून जाते आणि अहमदनगर रिजनल प्लॅन मध्ये काय तरतुदी केल्या आहेत त्यासाठी पार्ट 2 अहमदनगर रिजनल प्लॅन सोबत पाठवण्याची सोय तुमच्या पेजवर उपलब्ध करण्यासाठी उपलब्ध नाही आहे ती उपलब्ध केली तर मी पाठवतो.