वाहनचालकांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन
संगमनेर महामार्ग पोलीस उपक्रम

प्रतिनिधी —
रस्ता सुरक्षा सप्ताह च्या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील महामार्ग पोलिसांच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक चालकांना वाहन नियमांचे व वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यात आहे. यावेळी महामार्ग पोलीस व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन वेगवेगळ्या वाहनचालकांचे प्रबोधन केले.
महामार्ग पोलीस मदत केंद्र डोळासणे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच अर.एस. गुंजाळ ईन्स्टीट्युट चे अँग्रीकल्चर बिझनेस मँनेजमेंट चे प्राचार्य लामतुरे व त्यांचे सहकारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या वेळी वाहनचालकांना वाहतुक नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रबोधन केले. विद्यार्थी व विद्यार्थीनींनी वाहतुकीच्या नियमांचे माहीती फलक, तसेच घोषवाक्य तयार केलेले फलक दाखवुन, वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत विनंती केली.
महामार्ग पोलीस केंद्र डोळासणे हद्दीत नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH60 वर कुलवंत कुमार सरंगल अप्पर पोलीस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य मुंबई, संजय जाधव पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, परीक्षेत्र पुणे, प्रीतम यावलकर पोलीस ऊपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक परीक्षेत्र पुणे, मोहन बोरसे पोलीस निरीक्षक महामार्ग सुरक्षा विभाग अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी वाहनचालकांना हेल्मेट/सिटबेल्ट वापरणे, लेन ची शिस्त पाळणे, महामार्गावर मध्येच वाहने थांबवु नये, मद्य पिऊन वाहने चालवु नये, वाहनांची निगा राखणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे बाबत विनंती करण्यात आली.
महामार्ग पोलीस डोळासणे येथील केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
