कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदानासाठी यशोधन कार्यालयात शनिवारी कॅम्पचे आयोजन
प्रतिनिधी —
कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या ज्या निकटतम नातेवाईकास ५० हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान ऑनलाईन अर्ज भरूनही अद्याप मिळालेले नाही फक्त अशा नातेवाईकांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी, सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत मूळ कागदपत्रे तपासणींचा वैद्यकीय विभागाच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संकटात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
याकरिता भरावयाच्या ऑनलाईन फॉर्म साठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे अनेकांना हे ५० हजार रुपयाचे अनुदान मिळाले आहे. मात्र ५० हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान ऑनलाईन अर्ज भरूनही अद्याप मिळालेले नाही फक्त अशा नातेवाईकांसाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी अर्जदाराची आधार कार्ड झेरॉक्स, मृत व्यक्तीच्या आधार कार्डची प्रत, जन्म किंवा मृत्यू नोंदणी कायदा प्रमाणपत्र, अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते नंबर, अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेकची प्रत, मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, rt-pcr रिपोर्ट / सिटी स्कॅन व इतर मेडिकल कागदपपत्रांची आवश्यकता असून शनिवारी यशोधन जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहावे.

तसेच याबाबत अधिक माहिती करता 02425 -227303 व 9689304304 या नंबर वर अधिक संपर्क करावा असे आवाहन इंद्रजीत थोरात व यशोधन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
