मालुंजे गावात गौण खनिज – मुरूम चोरीचा धुमाकूळ !

ग्रामपंचायतीचा पदाधिकारी तस्करीत सहभागी..

प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील मालुंजे या गावात गौण खनिज तस्करी मुरूम मोठ्या प्रमाणात उत्खनन करून चोरी आणि तस्करी केली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अगदी दिवसाढवळ्या आणि रात्री होणाऱ्या या मुरूम चोरीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

विशेष म्हणजे या तस्करीत स्थानिक ग्रामपंचायतीचा एक पदाधिकारीच सहभागी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित विभागाकडून होत नसल्याने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. डंपर जेसीबी च्या साह्याने हा मुरुम उपसा मोठ्या प्रमाणात केला जात असून डोंगर पोखरण्याचे काम सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

संगमनेर तालुक्यातील नद्यांमधून वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असली आणि कोणतीही कारवाई होत नसली तरी गौण खनिज चोरी आणि तस्करी देखील मागे राहिलेली नाही. महसूल प्रशासनातील जबाबदार अधिकारी याकडे अक्षरश: दुर्लक्ष करत असून राजकीय वरदहस्त असल्याने संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे.

तलाठी, मंडळ अधिकारी यांचे दुर्लक्ष

गावामध्ये सर्रासपणे दिवसा आणि रात्री हा मुरूम उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी जेसीबी डंपर अशा वाहनांचा वापर केला जातो. हा सर्व प्रकार सुरू असताना महसूलच्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याची जबाबदारी असून देखील या मुरूम चोरीवर कुठलीही कारवाई होत नाही. गौण खनिज तस्करी पकडण्यासाठी असलेले भरारी पथक कार्यरत आहे की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!