राजूर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाळासाहेब टपळे यांना भारत सरकारचे पेटंट प्रदान
प्रतिनिधी —

राजूर – येथील ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. बाळासाहेब टपळे यांना भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून त्यांनी केलेल्या संशोधनावर पेटंट मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख यांनी दिली.

मध हे रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपारिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचे पेट्यांमध्ये संगोपन करून आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक किंवा गटाने मधमाशी पालन सुरु करता येऊ शकते. मध व मेण यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एका पेटीत दहा फ्रेम असतात फ्रेम मध्ये एकेक करुन मधमाशा शिरतात व मध जमा करतात.

एका पेटीत साधारणपणे ३० ते ४० हजार मधमाशा राहतात. मधमाशी पालनासाठी पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मधमाशीपालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे सूर्यफूल व विविध फळे यासारख्या पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधमाशांच्या पोळ्यात मधमाशांची संख्या, वाढ तसेच मधमाशांच्या शत्रू द्वारे मधमाशांचे प्रमाण कमी होते. अशी माहिती डॉ. टपळे यांनी दिली.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राजुर येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. बाळासाहेब टपळे यांनी मधमाशी पालनासाठी “स्मार्ट हनी कोंब मॉनिटरिंग डिवाइस” हे उपकरण तयार करून त्याचे पेटंट मिळविले आहे. सदर पेटंट भारत सरकारच्या पेटंट जर्नल नं. ०६/२०२२ दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाशित झाले आहे.

या उपकरणात विविध कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचा उपयोग मधमाशांच्या पोळ्या मध्ये विविध प्रकारचे संशोधन करण्यासाठी होणार आहे. मधमाशांच्या पोळ्या मधील हालचाली व त्यातील माहिती बाहेर डिस्प्ले वरती मिळणार आहे.
सदर पेटंट प्रसिद्ध झाल्याबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष एम. एन. देशमुख, संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, सत्यनिकेतन संस्थेचे सर्व सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

मधमाशी परागीकरण क्रियेचा शेतकरी आणि फळबाग बागाईतीसाठी सर्वात जास्त उपयोगी घटक आहे. परागीकरण झाले नाही तर शेती व फळ उत्पादन घटत्या हे सर्वश्रुत आहे. अमेरिकेत फळबाग फळभाज्या याचं उत्पादनात अचानक घट झाली तेव्हा संशोधकांना असे लक्षात आले कि मधमाशांचे मनमानी मध मिळवण्यासाठी निमित्ताने मधमाशांचे खच्चीकरण होत गेले आहे व त्यांची संख्या कमी झाली आहे. त्या मुळे बदामाचे झाडांची उत्पादन क्षमता कमी होत गेली आहे आणि हे जर असेच होत राहिले तर बदामाचे पिक व उत्पादन कमी कमी होत जाणार. म्हणूनच अमेरिकेत शेती खात्याने मधमाशी संख्या वाढ करण्याचे ठरविले व फळबागांमध्ये व शेतामध्ये मधमाशांचे पेटीमध्ये पुनर्वसन केले व पेट्यांची संख्येत प्रचंड मेहनत घेऊन व शेतामध्ये व फळबागांमध्ये मधमाशी पालन सक्तीने करून शेती व फळबाग उत्पादन वाढवले व जगामध्ये अव्वल स्थान कमावले. इतर देशांना पीएल४८० कायदा केला व निर्यातीवर भर देऊन अमेरिकेने भारतासारख्या देशावर वर्चस्व गाजवले. भारतात लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले व त्यांचे लक्षात आले कि जगात सर्वात जास्त शेती व फळबागा असून सुद्धा उत्पादन सर्वात कमी होत आहे. त्यातच परकिय आक्रमण आणि युद्धात लागणारे सैन्याला शस्त्र पुरवठ्याची उत्पादन करणा-या कारखान्यात उपलब्ध क्षमतेपेक्षा कमी उत्पादन होत आहे. त्यामुळे आयात खरेदी करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो आहे. त्यामुळे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा देत शेतीला व शस्त्र उत्पादन वाढवून भारताला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी जनतेला फक्त एकवेळ जेवण करून पैसा जमा करायला उद्युक्त केले.
त्यामुळे आज भारत शेती व फळबाग उत्पादन वाढवून व गोदामात पाठवायला व शस्त्रास्त्रे साठवण्याची फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया व ॲम्युनिशन फॅक्टरी संख्या वाढ करण्याचे ठरविले. आज भारताला त्यामुळे अन्नधान्याची व फळे तसेच शस्त्रास्त्रे निर्यात करून पैसे कमावता येऊ लागले. भारत एक स्वयंपूर्ण देश म्हणून जगात पहिल्या क्रमांकावर जात आहे. फक्त आयात नाही तर तंत्रज्ञान विकसित करून उत्पादनात व रोजगार निर्मिती मध्ये अग्रेसर होतांना दिसत आहे. रशिया अमेरिका इंग्लंड व फ्रान्स, जर्मनी हे युरोपियन देश भारताला वचकून आहेत.
अजूनही खेडोपाडी त्याची संपूर्ण अंमलबजावणी आज सत्तेवर असलेली राज्य व केंद्र सरकारला जाणीव होत नाही. फक्त महसूल वाढ होण्यासाठी सर्व सामान्य जनतेला पॅन कार्ड व आधार कार्ड अनिवार्य करून सक्ती महसूल वाढ करताना दिसत आहे. करप्रणाली सुधारण्यासाठी जीएसटी सारखं चुकीचे पद्धतीने धोरण अमलात आणले जात आहे व केंद्र व राज्य सरकारे एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.