कला व वाणिज्य महाविद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम) राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन बारी (कळसुबाई) येथे संपन्न _

प्रतिनिधी — 

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम) द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन प्राचार्य सुनील एकनाथ मालुंजकर यांनी बारी येथे केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

नरेंद्र साबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थीनींनी अन्याय सहन करू नये. मी आपल्या मोठ्या भावाप्रमाणे आपल्या पाठीशी आहे. आमचे पोलिस प्रशासन सदैव आपल्यावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला आळा घालण्यासाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहोत.  आजूबाजूला, गावात, समाजात, महाविद्यालय परिसरात कोणी त्रास देत असतील तर निःसंकोचपणे फोन करा आमचे पोलिस प्रशासन आपल्या सेवेसाठी ऑनड्युटी २४ तास तत्पर आहेत.


पुढे बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांचे महत्त्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच इतर जे काही उपक्रम राबविले जातात. त्यांच्या माध्यमातून रुजविली जाणारी सामाजिक मूल्य आपल्यात रुजवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. असे सांगून ते म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे पुढे जाण्याचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.वाळुंज पी.बी. यांनी महाविद्यालय हे विद्यार्थी कल्याणाच्या द्रुष्टीने वाटचाल करत असून  महविद्यालयात करीअर अँकेडमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज ग्रंथालय व संस्था कार्यकारीणी यांचे मार्गदर्शन नेहमी महाविद्यालयास लाभत असते व नविन उपक्रमांविषयी माहिती दिली जाते.

या कार्यक्रमासाठी पोलिस अमंलदार फटांगरे, परते व महाविद्यालयातील  प्रा. श्र्वेताली देशमुख, प्रा.भाऊराव भागडे , प्रा.सुनिल आवारी, प्रा.संतोष तारगे , प्रा.आनंदा धनगर, अमित अवसरकर प्रा. स्वाती नवले, मनोहर भांगरे, योगेश मधे, तसेच बारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाची सुचना महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. बांगर बी.एस. यांनी मांडली. अनुमोदन प्रा. आवारी एस. बी. यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. लोटे एम. एन यांनी केले.

 

RRAJA VARAT

One thought on “कला व वाणिज्य महाविद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम) राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन बारी (कळसुबाई) येथे संपन्न _”
  1. जोर्वे रस्त्यावर मेहेर मळ्याशेजारी शेत जमिन शाळा चालु करण्यासाठी लाॅन्गलिजवर देणे आहे 1.25हेक्टर क्षेत्र आहे. पेटिट हायस्कूल मध्ये माझे वडील व भाऊ बहिण शिकत होते. त्यांच्या स्मरणार्थ देण्याचा मानस आहे.
    तुम्ही त्या साठी काय मदत करू शकता?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!