छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात सामील करा – मुस्लिम विद्यार्थ्यांची मागणी

अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेज च्या मुस्लिम विद्यार्थी, शिक्षकांनी केली ही मागणी
प्रतिनिधी –
छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र भरातील विद्यार्थ्यांना ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक वाटण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे .
आज शिवजयंतीनिमित्त येथील अँग्लो उर्दू जुनियर कॉलेज मध्ये या पुस्तक वाटपाचा सोहळा पार पडला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी देखील वरील मागणी केली आहे.

देशातील विद्यार्थी हे धर्मांध बनवले जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ह्या देशाला नितांत गरज आहे. शिवराय हे रयतेचे राजे होते. अठरा पगड जातींना एकत्र करून रयतेचे राज्य तयार केले होते.
परंतु आजची तरुण पिढी खरे शिवराय न वाचता समाजाला धार्मिककते कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

त्यामुळे कॉ.गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं अतिशय खरे शिवराय समजून सांगणारे ‘शिवाजी कोण होता’ ही ५ लाख पुस्तके विद्यार्थ्यां पर्यंत छात्रभारती च्या वतीने पोहचवणार आहेत.

अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे आज ह्या संकल्पनेला सुरुवात केली. यावेळी प्रा. तुळशीराम जाधव, ॲड.नईम इनामदार, डॉ. सुनीता राऊत, प्राचार्य शेख सर, अझीज ओहरा, संदीप आखाडे, आधी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

छात्रभारती चे राज्य संघटक अनिकेत घुले यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी संगमनेर तालुकाध्यक्ष तृप्ती जोर्वेकर, राहुल जऱ्हाड, पूजा भालेराव, स्नेहल रहाणे, शुभम वर्पे, मयूर चौधरी, सानिया शेख, पूजा अभंग, साक्षी वाकचौरे, कमलेश गायकवाड, आश्विन गायकवाड, आकाश आव्हाड, आकाश जेडगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

