कुठल्याही शाखेची पदवी घ्या पण मातृभाषेला विसरू नका ;
हरीयाणा राज्याचे ब्रँड अम्बेसिडर गौरव अग्रवाल

प्रतिनिधी —
कुठल्याही शाखेची पदवी घ्या पण मातृभाषेला विसरू नका असे सांगतानाच जगामध्ये होत असलेल्या बदलांचा स्विकार करताना स्वतःला छोटे समजू नका,यश मिळविण्यासाठी सर्वच क्षेत्रात कष्ट घ्यावेच लागतात. प्रयत्नात कुठेही कमी न पडता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश पद्मश्री डॉ विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि हरीयाणा राज्याचे ब्रँड अम्बेसिडर गौरव अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निरंजन घोष शैलेश अग्रवाल संजय अग्रवाल मनोज मलिक यांनी एकत्रितपणे विखे पाटील महाविद्यालयास सदीच्छा भेट देवून विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला.संस्थेचे चेअरमन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यासर्व उच्च पदांवर यशस्वीपणे कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्याचे स्वागत केले.

ब्रँड अम्बेसिडर गौरव अग्रवाल यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी गौरव राठी या विद्यार्थ्यास परदेशात शिक्षण घेण्यासाठी ७ लाख ५० हजार रुपयांचे सहकार्य दिले आहे.
विद्यार्थ्यांशी अतिशय दिखुलासपणे संवाद साधताना हरियाणा राज्याचे ब्रँड अम्बेसिडर यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत सुरूवातील तंत्रज्ञानाबाबत फारशा सुविधा नव्हत्या. परंतू प्राध्यापकांनी दिलेला आत्मविश्वास कामी आला.आज प्रगत तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे.जगातील बदलांचा स्विकार करताना न्यूनगंड बाजूला ठेवून पुढे जावे लागेल. कोणतयाही मोठ्या पदांवर पोहोचताना कष्टाची तयारी ठेवावी लागते. या कष्टातूनच नवा आत्मविश्वास मिळतो.प्रवरेत या आत्मविश्वासाने आम्ही घडलो असे गौवरोद्गार त्यांनी काढले.

संजीव अग्रवाल म्हणाले की, या महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या आठ हजार रुपयांवर पहीली नोकरी केली.परंतू मोठे उद्दीष्ट समोर ठेवून व्यवसायात उतरलो. या देशात प्रथम क्रमाकांची अर्चिस गॅलरी टाकून यश मिळविले. फक्त कष्ट आणि प्रामाणिकपणाची याला जोड सांगताना ५० कोटीचे उद्दीष्ट ठेवून ऑईल उत्पादन सुरू केले आहे. केवळ इच्छाशक्ती हवी यश मिळते असे सांगतानाच कुठल्याही शाखेची पदवी घ्या पण मातृभाषेला विसरू नका असे आव्हान त्यांनी केले.
संस्कार भारती पब्लिक स्कूलचे विश्वस्त शैलेश अग्रवाल यांनी मिळवलेले कोणतेही ज्ञान चौकटीत बांधून ठेवू नका,ज्ञान हे वाढवायचे असते. बदलत्या ज्ञानाच्या कक्षा आत्मसात करणे हे प्रगतीसाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी विद्यार्थ्याना आवर्जून सांगितले.

शिक्षण क्षेत्रात नावलौकीक प्राप्त केलेल्या लव्हली गृप ऑफ स्कूलचे चेअरमन डॉ. मनोज मलिक यांनी कौशल्य विकासाला खूप महत्व आले. त्यामुळेच आपल्या शिक्षणातील प्रवाह स्विकरारून व्यक्तिमत्व विकास साध्य करावा लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. निरंजन घोष यांनी अभियांत्रिकीची पदवी घेवून मेडीकल फिल्डमध्ये कार्यरत असल्याचे सांगताना कोणतेही काम करताना स्वतःमध्ये एक उर्जा निर्माण केली पाहीजे. कारण जेव्हा काहीच नव्हते तेव्हा आम्ही घडलो आता तर मोठ्या संधी तुमच्या समोर उभ्या असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, डॉ.सुनिल मिसाळ, प्रा.सीमा लोहाटे, डॉ.संजय तुरकुटे, डॉ प्रमोद कोळसे, प्रा.धनंजय आहेर, प्रा.कपिल ताम्हाणे आदीसह विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

संस्थेचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी जिथे घडतो तिथले नाते कायम ठेवतो. उच्चपदांवर कार्यरत असलेल्या पाच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास दिलेली भेट ही संस्थेची मोठी उपलब्धी असल्याचे आमदर विखे पाटील म्हणाले.
