संगमनेरातले कत्तलखाने धुमधडाक्यात सुरू आहेत..! एलसीबीचाही काना डोळा..!!

आमदार अमोल खताळ, नया है वह.. असल्याची चर्चा..

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरातील बहुचर्चित कुप्रसिद्ध अवैध कत्तलखाने अखंड अव्यहातपणे सुरूच असल्याचे समोर येत आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी कितीही आक्रमक भूमिका घेतली आणि कत्तलखान्यांवर कारवाई झाली, तरीही ‘आमदार खाताळ यांना न-जुमानता पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून गोवंश हत्या सुरूच आहेत.’ आपल्यावर कारवाई होईल याची कोणतीही भीती संबंधित अवैध उद्योग करणाऱ्यांना राहिली नसून “आमदार खताळ तो नया है, कुछ नही हो सकता” अशा प्रतिक्रिया या भागातून ऐकण्यास मिळतात.

गोवंश कत्तली करणाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. वास्तविक याआधी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दोषी धरून मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांकडून टीका केली जात होती. आता बरेच वर्ष झाले हिंदुत्ववाद्यांची सत्ता असूनही संगमनेरातले कत्तलखाने आणि गोवंश हत्या, मांस वाहतूक जनावरांची वाहतूक सुरूच आहे. मग ‘नेमके पाणी कुठे मुरते’ असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यापूर्वी एका पेट्रोल पंपावरून अवैध कत्तलखाने – पोलीस प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांची सेटलमेंट करून दिली जात असल्याची चर्चा देखील होती. अशाच सेटलमेंट पुन्हा सुरू आहेत की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

आमदार खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यातील सुमारे 14 पत्र्याच्या शेड्स उध्वस्त करण्यात आल्या. यावर कळस म्हणजे पोलिसांनी आणि नगरपालिकेने कोणत्या शेड्स उध्वस्त केल्या याबाबतची माहिती लपवून ठेवली. कोणावर ही कारवाई करण्यात आली आणि संबंधित अवैध उद्योग करणारे कोण ? यांची नावे देखील उघड करण्यात आली नाहीत. यामागे ‘सेटलमेंट’च असल्याचे बोलले जात आहे. आमदार खताळ यांना अंधारात ठेवले जात आहे की कत्तल खाण्याच्या विरोधातून आपली पोळी भाजणारी मंडळी हेतू साध्य करीत आहेत हा संशोधनाचा विषय झाला आहे.

एलसीबी शांत झाली…

सध्या संगमनेरच्या कत्तल खाण्याच्या विरोधातील तथाकथित आंदोलने शांत झाली आहेत. अनेक जण ‘गप गार’ पडले आहेत. पोलीसही कत्तलखान्याकडे डोळे झाक करतात. अधून मधून एखादी कारवाई करतात. चारच दिवसांपूर्वी कत्तलखान्यावर कारवाई झाली. त्यातून कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. पोलिसांना मात्र याचे काही घेणे देणे नाही असेच चित्र दिसत आहे. सातत्याने संगमनेरच्या कत्तलखान्यावर मोठ-मोठे छापे मारणारे एलसीबी चे पथक देखील आता शांत झाले आहे. बरेच दिवसापासून ते कत्तलखान्याकडे फिरकले नसल्याचे दिसते. संगमनेर शहरासह तालुक्यातील काही भागात जनावरांची वाहतूक, गोवंश हत्या, गोवंश मांस वाहतूक चालू असते. याकडेही एलसीबीच्या पथकाचे दुर्लक्ष आहे. विशेषत: संगमनेरातल्या सर्वच अवैध धंद्यांकडे एलसीबी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असा एलसीबीचा इतिहासच आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!