एकविराच्या शिबिरात 143 महिलांची कॅन्सर तपासणी

संगमनेर | प्रतिनिधी —

धावपळीचे जीवन, वाढलेला तणाव आणि असंतुलित आहार यांसह विविध कारणांमुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण हे दुर्दैवी झाले आहे. याबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हावी याकरता डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने आज झालेल्या मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात 143 महिलांनी आपली तपासणी करून घेतली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशन, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी डॉ. जयश्री थोरात, डॉ. अश्विनी देशमुख, इंडियन कॅन्सर सोसायटीचे किशोर साळुंखे डॉ. भाग्यश्री भुतकर, डॉ. सायली भेलसेकर, डॉ. मानसी जोगळेकर, डॉ मंदिप चड्डा, अविनाश आव्हाड, सोमनाथ गुंजाळ, सुविधा आरसिद्ध, डॉ. नितीन भांड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात 111 महिला व 32 पुरुषांनी आपली तपासणी केली.

या तपासणीमध्ये महिलांची एचपीव्हीडीएनए, व्हीआयए, बेस्ट चेकअप, ओरल क्लिनिकल चेकअप, बीपी शुगर यांसह सुमारे दहा हजार रुपयांच्या विविध मोफत तपासण्या करण्यात आल्या. दिवसभरात संगमनेर शहर व तालुक्यातील अनेक महिलांनी या मोफत शिबिरातून आपल्या तपासणी केल्या. ग्रामीण भागातील महिलांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रीडा महोत्सव होत आहे. यामध्ये यावर्षी सुमारे 5000 महिलांचा सहभाग राहिला असून या सात दिवसाच्या क्रीडा महोत्सवाच्या काळात नेत्र तपासणी बरोबर आरोग्य तपासणी ही करण्यात आली आहे. याचबरोबर एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या सहकार्याने संगमनेर मध्ये मोफत कॅन्सर तपासणी झाली.

सध्या सर्वांचे धावपळीचे जीवन झाले आहे. वाढता तणाव, असंतुलित आहार, व्यस्त जीवन शैली या विविध कारणांमुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आहे .पहिल्या व दुसऱ्या स्टेजला कॅन्सरचे लक्षणे लवकर लक्षात येत नाही. पण जर वेळोवेळी तपासणी केली तर कॅन्सर अगदी पूर्ण बरा करता येतो म्हणून प्रत्येकाने कॅन्सरची पूर्व तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कॅन्सरला घाबरून जाऊ नका कारण त्यावर मात करता येते असे त्या म्हणाल्या.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!