संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत भर घालणारी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचा शुभारंभ ! 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले लोकार्पण 

 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची प्रमुख उपस्थिती

 

प्रतिनिधी —

 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधी मधून संगमनेर शहराच्या विकासात आनखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून आज शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली तसाच या यंत्रणेचा शुभारंभ देखील करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

संगमनेर शहर हे अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे व प्रगतशील शहर असून यामध्ये दररोज येणार्‍या नागरिकांची मोठी वर्दळ असते. वाहनांची गर्दी, भरलेली बाजारपेठ यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून संगमनेर शहरात ३९ महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामधील तीन कॅमेरे हे पी टू झेड असून ३६० अंशात छायाचित्रण करणार आहेत.

याप्रसंगी प्रांताधिकारी शंशिकात मंगरूळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ आदिंसह सर्व नगरसेवक, शहरातील विविध पदाधिकारी, महसूल व पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!