शहरातून जाणाऱ्या कोल्हार घोटी रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसेल तर रस्ता तोडवा लागेल — पिचड यांचा इशारा

अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध कामांची घेतली झाडाझडती
ठेकेदाराच्या कामावर विविध शंका
प्रतिनिधी —
शहरातील ईबिते कामांचा दर्जा तसेच शहरातून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज या मार्गाच्या कामाबाबत विविध शंका उपस्थित करीत पहिल्याच बैठकीत माजी आमदार वैभव पिचड यांनी सर्व अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या कामात अनेक त्रुटी आहेत. शहरातील काम करताना कुठेही सिडिवर्क घेतलेला नाही. दोन्ही बाजुचे पाणी काढून देण्यास जागा ठेवलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात, दुकानात पाणी घुसेल.
तेव्हा तात्काळ सिडीवर्क करावे अन्यथा रस्ता फोडावा लागेल.
रस्त्याच्या एका बाजूने दुहेरी वाहतूक जाईल असा रस्ता तयार करूनच दुसऱ्या बाजुचे काम सुरु करावे.
अशा विवीध सुचना माजी आमदार वैभव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सुपरवायझरला करत. कामांच्या दर्जाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

अकोले नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा पदभार स्विकारल्यानंतर लगेच सभागृहात नुतन अध्यक्ष-उपाध्यक्ष सर्व सदस्य व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत पिचड यांची बैठक पार पडली झाली. यावेळी पिचड यांनी अतिशय आक्रमकपणे भुमिका घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, महेंद्र वाकचाैरे (उपविभागीय अभियंता, सा.बा.अकोले), इंजमाम शेख ( प्रोजेक्ट मॅनेजर, ठेकेदार कंपनी)
नगरसेवक हितेश कुंभार, सागर चाैधरी, शरद नवले, प्रदिपराज नाईकवाडी, नवनाथ शेटे, प्रतीभा मनकर, तमन्ना शेख, कविता शेळके, वैष्णवी धुमाळ, शितल वैद्य, जनाबाई मोहिते, माधुरी शेणकर, श्वेताली रुपवते, जेष्ठ नेते जे.डी आंबरे, परशराम शेळके, भाजपा युवक अध्यक्ष राहुल देशमुख आदि उपस्थित होते.

पिचड म्हणाले कि, रस्त्याचे काम सुरु असताना ठेकेदाराने कुठेही दिशादर्शक फलक, डिव्हायडर दर्शवणारे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी अपघात झाले. यात जखमी झालेल्या नागरीकांना ठेकेदाराने मदत करावी. अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा.
ठेकेदाराकडुन रस्त्यावर, झालेल्या कामावर पुरेसे पाणी मारले जात नाही. त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याचे काम सुरु असल्याने रहदारीचा प्रश्न निर्माण होऊन ट्राफिक जाम होते. ठेकेदाराने ट्राफिक सुरळीत करण्यासाठी माणसे ठेवावीत. जेणे करुन नागरिकांना वाहतुकीस अडचण होणार नाही. रस्त्याच्या कामाबाबतही अनेक तक्रारी आहेत. रस्त्याची लेव्हल एकसारखी नाही. रस्ता बनवताना निविदेतील नियमाप्रमाणे व वर्क ऑर्डर प्रमाणे होत नसेल तर रस्ता फोडून परत बनवावा लागेल.

शहरातील रस्ता बनवताना साईड गटारीतील व पावसाचे पाणी जाण्याचे नियोजन केले आहे का? रस्त्याच्या कामात कुठेही सिडिवर्क बांधलेला नाही.
संबंधित विभाग व ठेकेदार रस्त्याचे काम पूर्ण करुन जाईल मात्र पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या विविध अडचणींना शहरातील नागरिकांना तोंड द्यावे लागेल. दुकानात, घरात पाणी घुसले तर नागरीक नगरपंचायतला जबाबदार धरतील.
त्यामुळे ठेकेदाराकडून रस्त्याचे काम निष्काळजीपणे आणि दर्जाहीन सुरु असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणून आपण काय करत आहात असा असा सवाल करीत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

आम्ही सांगत असलेल्या समस्यांचे तात्काळ निराकारण करावे तसेच सूचनांचे योग्य पालन करावे. अन्यथा आम्ही नगरपंचायती च्या वतीने केंद्रीय विभागाकडून रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने थर्ड पार्टी क्वालिटी इन्सपेक्शन व्हावी अशी मागणी करु. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला जाईल असा इशाराही पिचड यांनी दिला.
बैठकीच्या सुरूवातीला नगरपंचायत मुख्याधिकारी यांनाही पिचड यांनी अनेक प्रश्नावर जाब विचारत प्रशासक काळातील कामकाजातील त्रुटी बाबत सुचना केल्या.
