बहुजन महापुरुषांचे साहित्य मंत्रालयातून गहाळ होणे हे षडयंत्र आहे….
राहुल गांधी समर्थक संघाचा आरोप — प्रांताधिकार्यांना दिले निवेदन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनाशी व कार्याशी आधारित माहिती व साहित्य मंत्रालयातून गहाळ होणे हे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप राहुल गांधी समर्थक संघाने केला असून सरकारचा निषेध करणारे निवेदन संगमनेर येथील प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

आरजीएसएस कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१७ ते २०२० दरम्यान महात्मा फुले यांच्या जीवनाशी व कार्याशी आधारित माहिती मंत्रालयातून गहाळ झाली.ही खूप मोठी शोकांतिकेची बाब आहे.
बहुजन थोर महामानवांचे ऐतिहासिक साहित्य जर मंत्रालयातून गहाळ होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण होतो. नागरिकांनी कोणाच्या भरोश्यावर जीवन जगायचे.

एक बाजूला सरकारचे समर्थक सतत बहुजन थोर महापुरुषांचा अवमान करत असतात व त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याच समर्थकांच्या सरकारच्या कार्यकाळात बहुजन महापुरुषांचे साहित्य मंत्रालयातून गहाळ होत असेल तर हे खूप मोठे षडयंत्र आहे.असे चित्र दिसून येत आहे.
बहुजन थोर महापुरुषांना अपमानित करण्याचे आणि त्यांचे साहित्य नष्ट करण्याचे हे जाणूनबुजून खूप मोठे षडयंत्र रचले जात आहे.

बहुजन महापुरुषांचे विचार सरकारला अडचणीचे ठरत आहे.असे सरकारला भासत आहे.म्हणून जाणूनबुजून अश्या गोष्टी सरकारकडून होताना दिसत आहे.
एवढ्या सुरक्षेत मंत्रालयातच जर ऐतिहासिक साहित्य सुरक्षित नसेल तर ऐतिहासिक साहित्यासाठी नागरिकांनी कोणाकडे बघायचे.
एक बाजूला तीन चार वर्षापासून सरकार महात्मा फुले यांचे कोणतेही साहित्य प्रकाशित करत नाही तरीही त्यावरील निधी खर्च होतो.याला षडयंत्र म्हणायचे नाही मग काय म्हणायचे.

या गहाळ झालेल्या साहित्याबद्दल मरीन ड्राइव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होतो आणि तो व्यक्ती या विज्ञानयुगात अजूनही सापडला जात नाही.ही खूप मोठी शोकांतिका आहे.व खूप मोठे षडयंत्र आहे.
आपणांस विनंती आहे की आपण लवकरात लवकर या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधून गुन्हेगाराला पकडून त्यावर कठोर कारवाई करावी.व बहुजन महापुरुषांचा इतिहास जीवन ठेवावा.
यावेळी अमोल शेलकर, सतीश खताळ, राम अरगडे, अरुण चव्हाण, प्रकाश कडलग, अरुण गावित्रे, अरुण जाधव, रवींद्र हासे राजेंद्र, गिरी आदी उपस्थित होते
