उसाला पहिली उचल 3 हजार 300 रुपये मिळावी यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना निवेदन 

 शेतकरी संघर्ष समिती

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

उसाला पहिली उचल 3300 मिळावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना निवेदन देण्याची सुरुवात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अगस्ती सहकारी साखर कारखान्याला निवेदन देऊन करण्यात आली.

ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ऊस दरासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून हे निवेदन देण्यात आले.

ऊस तुटून गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत पहिली उचल देण्याच्या तरतुदीनुसार अगस्ती कारखान्याने तातडीने पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी ही मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.

डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, गणेश ताजने, एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, सदाशिव साबळे, तुळशीराम कातोरे, संगीता साळवे, हेमलता शेळके आदींनी शिष्टमंडळामध्ये सहभाग होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!