आखाडाची पार्टी….. शिवीगाळ दमदाटी करणाऱ्या दारुड्या वकिलाची धुलाई !
नशेत गाडीची धडक देऊन वॉल कंपाऊंड तोडले…
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 24
संगमनेर शहरात दारू पिऊन तर्रर्र झालेल्या एका वकील महाशयाने आपल्या ताब्यातील गाडी सुसाट चालवून एका बंगल्याची वॉल कंपाऊंड तोडली. वर समजावून सांगणाऱ्या लोकांनाच शिवीगाळ दमदाटी सुरू केल्याने त्या नागरिकांनी सदर वकिलाची चांगलीच धुलाई केली. पोटभर मार खाल्ल्यानंतर वकील चुपचाप आपल्या घरी निघून गेले असल्याची चर्चा आहे.
सध्या आखाडाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अमावस्येच्या जोरदार पार्टी करून नशेमध्ये धुंद असणाऱ्या वकिलाने हायवे वरून जाताना आपल्या एका खास व्यक्तीच्या भेटीसाठी हायवेच्या कडेला असणाऱ्या कॉलनीत गाडी घातली. काही वेळाने त्यातून पुन्हा बाहेर पडताना नशेमध्ये गाडी भरधाव वेगाने चालवून एका बंगल्याची संरक्षक भिंत तोडली.

या आवाजाने आजूबाजूचे रहिवासी खडबडून जागे झाले. लोक जमा झाले. भिंतीला धडक दिल्याने वकील साहेबांच्या गाडीची चांगलीच तूट फूट झालेली होती. बाहेर पडलेल्या मद्यधुंद वकिलांना समजावून सांगणाऱ्या नागरिकांनाच वकील महाशयांनी शिवीगाळ दमदाटी सुरू केली. मी वकील आहे अशी अरेरावीची भाषा वापरायला सुरुवात केल्याने संतापलेल्या जमावाने सदर तराट वकील वकील महोदयांना येथेच सोप देऊन चांगलेच बुकलून काढले.

आखाडात दारू पार्टी बरोबरच प्रचंड लाथा बुक्क्यांची पार्टी घेऊन सदर वकील महाशय बिन बोभाट पणे निर्लज्जपणे आपल्या घराकडे परतले. गाडीचे तर नुकसान झालेच पण सर्वत्र या घटनेचे चर्चा सुरू झाल्याने सदर वकील आणि त्यांचे उद्योग चांगले चव्हाट्यावर आले आहेत.
