घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद !
पावशेर सोन्यासह 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
4 जिल्ह्यातील 16 गुन्ह्यांची उकल ; नगर एलसीबीची कारवाई
संगमने टाइम्स न्यूज नेटवर्क दिनांक 5
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अहिल्यानगर एलसीबी च्या पथकाने घरफोडी करणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद केले असून त्यामुळे चार जिल्ह्यातील 16 घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. पकडलेल्या आरोपींकडून तब्बल पावशेर (250 ग्रॅम) सोन्यासह 24 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शालिनी बाळशीराम शेळके, (वय 50, रा.बोटा, ता.संगमनेर) या त्यांचे राहते घर बंद करून बाहेरगावी गेल्या असताना अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून घरामधून सोन्याचे दागीने चोरून नेले. याबाबत घारगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 200/2025 बीएनएस कलम 305 (अ), 351 (3), 331 (4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दिनांक 05/07/2025 रोजी पथकास गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घारगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले (रा. बेलगांव, ता. कर्जत) याने साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने कर्जत तालुक्यात आरोपीतांचा शोध घेऊन 1) मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले, वय 28, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर 2) सुनिता उर्फ सुंठी देविदास काळे, वय 35, रा.नारायण आष्टा, ता.आष्टी, जि.बीड 3) एक विधीसंघर्षित बालक, वय 17, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपी मिलींद ईश्वर भोसले याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस त्याने सदरचा गुन्हा त्याचे वरील साथीदारसह 4) शुभम उर्फ बंटी पप्पु काळे रा.एम.आय.डी.सी. अहिल्यानगर (फरार) 5) सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा. बेलगांव, ता. कर्जत (फरार), 6) संदीप ईश्वर भोसले रा. सदर (फरार), 7) कुऱ्हा ईश्वर भोसले रा. सदर (फरार) अशांनी मिळून त्यांचेकडील दोन मोटार सायकलवरून बंद घराची पाहणी करुन घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती सांगीतली.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोउपनि/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भगवान धुळे व भाग्यश्री भिटे यांनी केली आहे.

पथकाने ताब्यातील आरोपी मिलींद ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन त्यांनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत याबाबत चौकशी केली असता त्याने या साथीदारासह अहिल्यानगर जिल्हयातील घारगाव, श्रीरामपूर, संगमनेर त्याचप्रमाणे पुणे, सातारा, नाशिक जिल्हयामध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याच्या सांगीतलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे 16 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 घारगाव गुरनं 200/2025 बीएनएस कलम 331 (4), 351(3), 305 (अ)
2 घारगाव गुरनं 208/2025 बीएनएस कलम 331 (4), 351(3), 305 (अ)
3 घारगाव गुरनं 209/2025 बीएनएस कलम 331 (4), 351(3), 305 (अ)
4 घारगाव गुरनं 210/2025 बीएनएस कलम 331 (4), 351(3), 305 (अ)
5 घारगाव गुरनं 212/2025 बीएनएस कलम 303 (2)
6 श्रीरामपूर तालुका गुरनं 275/2025 बीएनएस कलम 331 (3), 305
7 श्रीरामपूर तालुका गुरनं 277/2025 बीएनएस कलम 331 (3), 305
8 लोणी गुरनं 311/2025 बीएनएस कलम 331 (3), 305
9 संगमनेर तालुका गुरनं 434/2025 बीएनएस कलम 331 (3), 305
10 संगमनेर तालुका गुरनं 436/2025 बीएनएस कलम 331 (3), 305
11 संगमनेर शहर गुरनं 605/2025 बीएनएस कलम 331 (3), 305
12 संगमनेर तालुका गुरनं 433/2025 बीएनएस कलम 331 (7), 305
13 फलटण ग्रामीण गुरनं 495/2025 बीएनएस कलम 331 (3), 305(अ)
14 लोणंद गुरनं 246/2025 बीएनएस कलम 331 (3), 305(अ)
15 वावी गुरनं 273/2025 बीएनएस कलम 331 (3), 305 (अ)
16 आळेफाटा गुरनं 186/2025 बीएनएस कलम 331 (3), 305 (अ)

ताब्यातील आरोपी मिलींद ईश्वर भोसले याचेकडे गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने काही मुद्देमाल हा त्याची बहीण सुनिता उर्फ सुंठी देविदास काळे, (रा.नारायण आष्टा, ता.आष्टी, जि.बीड) व त्याची पत्नी कोमल मिलींद भोसले यांचे मार्फतीने सोनारास विकला असल्याचे व काही मुद्देमाल त्याने त्याचे नातेवाईकाचे घरामागे लपवून ठेवला असल्याची माहिती सांगीतली.
पथकाने पंचासमक्ष सोनाराने हजर केले 4,50,000/- रू किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व आरोपीने काढून दिलेला 19,76,000/- रू किंमतीचा मुद्देमाल त्यात 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध वर्णनाचे दागीने, गुन्हयाचे वेळी वापरलेला गावठी कट्टा (अग्नीशस्त्र), 3 जिवंत काडतुस, मोटार सायकल व लोखंडी कटावणी असा एकुण 24,26,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले हा सराईत आरोपी असून त्याचेविरूध्द यापुर्वी दरोडा 03, दरोडा तयारी 02, जबरी चोरी 01, घरफोडी 10 व चोरीचे 02 असे एकुण 18 मालाविरूध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी घारगाव पोलीस स्टेशन गुरनं 200/2025 बीएनएस 331 (4), 351(3), 305 (अ) या गुन्हयाचे तपासकामी घारगाव पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे.
