अवैध वाळु तस्करांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई !
19 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह 4 आरोपी ताब्यात
श्रीरामपूर प्रतिनिधी दिनांक 4
जिल्ह्यातील अवैध धंद्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई सुरू असून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या श्रीरामपूर येथील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 19 लाख 90 हजार रुपयांचा मध्यमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, संदीप दरंदले, रणजीत जाधव, आकाश काळे व रमीजराजा आत्तार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, नायगाव शिवार ता.श्रीरामपूर येथील गोदावरी नदीपात्रात दोन इसम ट्रॅक्टरट्रॉली मधून वाळू उपसा करून वाहतुक करीत आहेत. मिळालेल्या माहितीतील नमूद ठिकाणी पथक गेले असता दोन ट्रॅक्टर मजुरांच्या सहाय्याने वाळु भरताना मिळून आल्याने, पथकाने छापा टाकुन कारवाई करून दोन ट्रॅक्टर चालक 1) करण अशोक वाघ, (वय 20, रा.नायगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) 2) अनिल नारायण आमले, (वय 24, रा.गोंडेगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) तसेच ट्रॅक्टर मालक 3) दत्तात्रय रावसाहेब भवार, (रा.गोंडेगाव, ता.श्रीरामपूर,) जि.अहिल्यानगर व 4) आदित्य काकासाहेब दिवे, (रा.गोंधवणी वॉर्ड नं.1, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) अशांना ताब्यात घेतले. ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुक व उपसाबाबत परवाना नसल्याने घटनाठिकाणावरून 19,90,000/- रू किं.त्यात दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह व दोन मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पथकाने ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. आरोपीविरूध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 353/2025 बीएनएस 2023 चे कलम 303 (2), 3 (5) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.दाखल गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
