पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाचा संगमनेरच्या कत्तलखान्यात छापा !
दोन हजार किलो गोवंश मांस पकडले !!
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 4
पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना गोवंश कत्तल होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्या नंतर पथकाने शहरातील मदिना नगर परिसरात छापा टाकून 2 हजार किलो गोवंश मांसासह 6 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस कॉन्स्टेबल राहुल डोके पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, सुहास मोरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोसई रावसाहेब लोखंडे, पोकॉ निखिल गायकवाड, पोकॉ विशाल कर्पे, मचापोकॉ रोकडे यांच्या पथकाने केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील मदिना नगर परिसरात सोफियान कुरेशीच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने खाजगी वाहनातून घटनेच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे पत्र्याच्या वाड्यात कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस व वाड्याच्या बाहेर कंपाऊण्डमध्ये उभी असलेल्या एका रिक्षामध्ये अनावश्यक अवयव भरलेले दिसुन आले.

सदर ठिकाणी तिन इसम मिळून आले. १) मकसुद फिरोज कुरेशी (वय २३ वर्षे, रा. भारतनगर, संगमनेर) २) अहमद सांडु कुरेशी (वय ३२ वर्षे, रा.जमजम कॉलनी, संगमनेर) ३) मोहंमद रफिक शेख (वय ४० वर्षे,रा.जमजम कॉलनी, संगमनेर, ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी तिघांची नावे आहेत. त्यावेळी त्यांना सदर गोवंश जनावरांची कत्तल कोणाच्या सांगण्यावरुन केली व सदरचा पत्र्याचा वाडा हा कोणाच्या मालकीचा आहे याबाबत विचारले असता त्यांनी सदरचा वाडा हा सोफियान नासिर कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) याचा असून सदर वाड्यात सध्या इसम नामे सोनू उर्फ आतिक रफिक कुरेशी व सालेम रियाज कुरेशी (दोघे रा. मोगलपुरा, संगमनेर) यांच्या सांगण्यावरुन सदरच्या गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याचे सांगितले.

सदर ठिकाणी गोमांस व गोमांसचे अनावश्यक अवयव मिळून आल्याने ते दुसऱ्या माल वाहतूक वाहनामध्ये भरले. सदर ठिकाणी एक कुऱ्हाड, दोन टोचे, एक सुरा, एक लोखंडी हुक व वजन काटा मिळुन आला आहे.
मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे
१) ६,००,०००/- रु किं.चे कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे गोमांस व अनावश्यक अवयव अंदाजे २००० किलो प्रत्येकी ३०० रुपये किलो प्रमाणे.
२) ३५,००० /- रु. किं.ची एक काळ्या रंगाची विना नंबरची रिक्षा किं. अं.
३) ५००० /- रु. किं.चा एक हिरव्या रंगाचा ईलेक्ट्रिक वजन काटा किं.अं.
४) २५००/- रु. किं.चे. एक कु-हाड, दोन टोचे, एक सुरा व एक लोखंडी हुक प्रत्येकी किं. ५००/- रु प्रमाणे एकूण ६,४२,५००/- वरील वर्णनाचे व किंमतीचे कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे गोमांस, अनावश्यक असलेले अवयव व इतर साधने मिळून आली.

महाराष्ट्र राज्यामध्ये गोंवशी जनावराचे कत्तल करण्याची मनाई असतांना व नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असतांना देखिल सोफियान कुरेशी याच्या वाड्यात, मदिनानगर, संगमनेर येथे गोवंश जनावरांची कत्तल करुन गोमांस, गोमांसाचे अनावश्यक असलेले अवयव व नमुद हत्यारानिशी आरोपी १) मकसुद फिरोज कुरेशी वय २३ वर्षे, रा.भारतनगर, संगमनेर २) अहमद सांडु कुरेशी वय ३२ वर्षे,रा.जमजम कॉलनी, संगमनेर ३) मोहंमद रफिक शेख वय ४० वर्षे, रा.जमजम कॉलनी, संगमनेर, ता.संगमनेर,जि.अहिल्यानगर हे मिळुन आले आहेत.

सदरचा वाडा हा सोफियान नासिर कुरेशी रा. मदिनानगर, संगमनेर याचा असून त्याने सदरच्या वाड्यामध्ये पाण्याची व लाईटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सदर वाड्यात सध्या सोनू उर्फ आतिक रफिक कुरेशी व सालेम रियाज कुरेशी (दोघे रा. मोगलपुरा, संगमनेर) यांच्या सांगण्यावरुन सदरच्या गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याचे सांगितले आहे. म्हणुन आरोपी १) मकसुद फिरोज कुरेशी वय २३ वर्षे, रा.भारतनगर, संगमनेर २) अहमद सांडु कुरेशी वय ३२ वर्षे, रा.जमजम कॉलनी, संगमनेर ३) मोहंमद रफिक शेख वय ४० वर्षे, रा. जमजम कॉलनी, संगमनेर ४) सोफियान नासिर कुरेशी रा. मदिनानगर, संगमनेर(फरार), ५) सोनु उर्फ आतिक रफिक कुरेशी रा. मोगलपुरा, संगमनेर (फरार), ६) सालेम रियाज कुरेशी रा. मोगलपुरा, संगमनेर ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर (फरार) यांचे विरुध्द बीएनएस कलम २७१, ३२५, ३ (५) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५, ५ (क), ९, ९ (अ), आर्म आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
