संगमनेर शहरात पुन्हा अडीच हजार किलो गोवंश मांस पकडले !

गोवंश कत्तलींचा हैदोस 

तरीही… प्रशासन पोलिसांकडून कायमचा बंदोबस्त होत नाही…जनतेमध्ये प्रचंड नाराजी 

 

लाखो रुपयांची उलाढाल आणि तेवढ्याच प्रमाणात हप्तेखोरी, राजकीय कारणामुळे संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने बंद करण्याची धमक आता कोणातही राहिली नाही. बोलबच्चन करणारे नेते त्यांच्या पाठीराख्या संघटना आणि कागदी घोडे नाचवणारे हिंदुत्ववादी पुढारी यांचीही डाळ आता शिजत नसल्याचे चित्र दिसत आहे.

 

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 9 

संगमनेर शहर आणि तालुक्यात गोवंश हत्या आणि अवैध कत्तलखान्यांनी धुमाकूळ घातला असून पोलीस कारवाया चालू असल्या तरीही कायमस्वरूपी गुन्हेगारांचा बंदोबस्त होत नसल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून रोज सर्रासपणे गायी कापणाऱ्या गुन्हेगारांनी अक्षरशः शहरासह तालुक्यात हैदोस घातला आहे.

लाखो रुपयांची उलाढाल आणि तेवढ्याच प्रमाणात हप्ते खोरी आणि राजकीय कारणामुळे संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने बंद करण्याची धमक आता कोणातही राहिली नाही. बोलबच्चन करणारे नेते त्यांच्या पाठीराख्या संघटना आणि कागदी घोडे नाचणारे हिंदुत्ववादी पुढारी यांचीही डाळ आता शिजत नसल्याचे चित्र दिसत आहे.

दोन दिवसात लागोपाठ झालेल्या पोलिसांच्या कारवाईने हजारो किलोमांस पकडण्यात आले. आज पहाटे स्वतः पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि पथकाने पुन्हा शहरातील मदिना नगर भागात छापा टाकून अडीच हजार किलो वंश मांस पकडले असून 12 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर एक जण पसार असल्याची माहिती मिळाली आहे.

संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरातील गल्ली नं 5 येथील फैजू फारुक कुरेशी याच्या पत्र्याच्या वाड्यामध्ये कमर अली गुलाम जिलानी सौदागर हा शहबाज बुढण कुरेशी याचेसह काहीजण गोवंश जनावरांची कत्तल करीत आहेत. अशी खबर उपाधीक्षक सोनवणे यांना मिळाल्यानंतर स्वतः सोनवणे व पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी एक इसम गोवंश कत्तल करत असताना तर दुसरा इसम हा कत्तल केलेले गोमांस हे वाड्याजवळ उभे असणाऱ्या चारचाकी वाहनात भरत असताना आढळून आले.

पोलीसांना पाहुन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सदर वाडा हा फैजू फारुक कुरेशी याचा असल्याचे समजले. सदर वाड्याची व वाहनाची पाहणी केली असता सदर ठिकाणी गोमांस व गोमांस अनावश्यक अवयव मिळुन आले. तसेच एक कोयता, एक लोखंडी हुक व त्यास वजन काटा, तसेच पळुन गेलेल्या इसमांच्या चपला मिळुन आल्या. मिळुन आलेल्या मुद्देमालाचे वर्णन

खालील प्रमाणे.

5,00,000/- रुपये किमंतीची महिंद्रा कंपनिची झायलो मॉडेलची सफेद रंगाची एम एच 02 बी एम

1503 असा क्रमांक असलेली मोटार वाहन, जु.वा.कि.अं.

7,50,000/- रुपये किमंतीचे गोमांस व अनावश्यक गोमांस अवयव, प्रति किलो 300 रुपये दराने

एकुण 2,500 किलो ग्रॅम वजनाचे

00-00/- रु किमंतीचा 9 इंच लांबीचा लोखंडी कोयता, एका बाजुला धारधार असलेला

5,000/- रुपये किमंतीचा एक इलेक्ट्रीक वजन काटा त्यास लोंखडी सळईचा हुक असलेला.

00/00/- रु किमंतीच्या चपला

12,55,000/- रुपये एकूण

वरील वर्णनाचे व किमंतीचे कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे गोमांस, अनावश्यक असलेले अवयव व इतर मुद्देमाल जप्त केला.

या संदर्भात पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, त्याचप्रमाणे पोलीस हवालदार अनिल कडलग, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!