स्थानिक गुन्हे शाखेचा संगमनेर मध्ये जुगार अड्ड्यावर छापा !
11 लाख 24 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर ग्रामीण पोलिसांचे पितळ उघडे पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार ?
प्रतिनिधी दिनांक 3 —
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतील आणि पोलीस अधीक्षकांचे पथक त्या ठिकाणी छापा टाकून ते उघड करतील अशा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नुकताच दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच संगमनेर तालुक्यातील ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत तळेगाव ते नांदूर शिंगोटे रोड लगत तिरट स्वरूपाच्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे आणि अकरा लाख रुपये पेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून ग्रामीण भागात अवैध धंदे सुरू असल्याचे उघड झाले आहे. संगमनेर तालुका पोलिसांचे पितळ उघडे पडले असून आता कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार बिरप्पा सिध्दप्पा करमल, बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे, अशोक हिरामन लिपणे, आकाश राजेंद्र काळे, रमिझराजा रफिक आतार हे संगमनेर शहर परिसरामध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास तळेगांव ते नादुर शिंगोटे कडे जाणाऱ्या रोडलगत एक इसम बांधकाम चालू असलेल्या घराच्या आडोशाला पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली.

पथकाने बातमीतील ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम दोन डावामध्ये पत्त्यावर पैसे लावून हारजितीचा जुगार खेळतांना दिसुन आलेे. सदर पत्ते खेळणारे पहिल्या डावातील 1) अजीज अबु शेख वय-45 वर्षे रा.तळेगांव दिघे ता.संगमनेर 2) आकाश बाबासाहेब गडाख, रा. पारेगांव बुाा ता. संगमनेर, 3) योगेश दत्तात्रय राहटळ रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर, 4) भास्कर बाबुराव पगार, रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर, 5) महेंद्र सुंदरलाल पाटणी, रा. तळेगांव दिघे ता. संगमनेर, 6) कैलास कारभारी मळे, रा. काकडवाडी ता.संगमनेर, 7) नंदु म्हतु पिंगळे, रा. तळेगांव दिघे ता. संगमनेर असे तसेच दुसऱ्या डावातील 8) इरफान युनिस शेख रा. लोणी (हसनापुर) ता.राहाता, 9) आशिफ कासम शेख, रा. करोले ता. संगमनेर, 10) रविद्र विठ्ठल जेजुरकर, रा. ममदापुर ता. राहाता, 11) एकनाथ रोहीदास जोरवेकर, रा. पोरेगांव ता. संगमनेर, 12) विलास भास्कर जगताप, रा. तळेगांव दिघे ता.संगमनेर, 13) दशरथ बिरु कांदळकर रा. वज्रडी बुाा ता. संगमनेर, 14) विजय रंभाजी ढवळे, रा.पारेगाव बु ाा ता. संगमनेर अशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने, रोख रक्कम, 13 मोबाईल 9 मोटारसायकल असा 11 लाख 24 हजार 600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील इसमांविरुध्द पोकॉ रमिझराजा रफिक आतार यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 438/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.
