दहा हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे
3 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट
प्रतिनिधी दिनांक 28
अहिल्यानगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये गावठी दारूचे कच्चे रसायन आणि गावठी दारू असे एकूण 3 लाख 37 हजार रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले. ही कारवाई श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. श्रीरामपूर मध्ये अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली असल्याचे यातून पुन्हा समोर आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, रमीजराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील अवैध गावठी हातभट्टी अड्डयांची माहिती काढुन छापे टाकुन कारवाई केली.पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 10 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 3,97,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं जप्त मुद्देमाल मुद्देमाल किंमत
1 श्रीरामपूर शहर 622/2025, 40 लि.हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 43000
2 श्रीरामपूर शहर 623/2025, 30 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 36000
3 श्रीरामपूर शहर 624/2025, 40 लि.हातभट्टी दारू व 250 लि.कच्चे रसायन 33000
4 श्रीरामपूर शहर 625/2025, 40 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 38000
5 श्रीरामपूर तालुका 341/2025, 50 लि.हातभट्टी दारू व 400 लि.कच्चे रसायन 50000
6 श्रीरामपूर तालुका 342/2025, 30 लि.हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 41000
7 श्रीरामपूर तालुका 343/2025, 35 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 37000
8 श्रीरामपूर तालुका 344/2025, 30 लि.हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 41000
9 श्रीरामपूर तालुका 345/2025, 45 लि.हातभट्टी दारू व 200 लि.कच्चे रसायन 29000
10 श्रीरामपूर तालुका 346/2025, 45 लि.हातभट्टी दारू व 400 लि.कच्चे रसायन 49000

सदर कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
