संगमनेर औद्योगिक वसाहतीत चोरी करणारे चोरटे पकडले
मुद्देमालही हस्तगत
उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर यांच्या पथकाची कारवाई

प्रतिनिधी —
संगमनेर औद्योगिक वसाहतीसह संगमनेर शहरात चोऱ्या करणाऱ्या चोरट्याची खबर मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात छापा टाकून या चोरट्याला पकडले अधिक तपास केला असता या चोरट्या कडून चोरी केलेला मुद्देमाल सुद्धा मिळून आला आहे. या चोरा बरोबरच त्याच्या साक्षीदारांनाही अटक करण्यात आलेली आहे. लॅपटॉप, टीव्ही यासह मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

संगमनेर उपविभागात चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने गुन्हेगाराची माहिती काढुन कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी मोहीम सुरू केली आहे.
मदने यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (रा. गुंजाळवाडी शिवार ता. संगमनेर)
याने त्याच्या साथीदारासह बरेच गुन्हे केले असुन तो व त्याचे साथीदार अशाप्रकारचे गुन्हे करत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या तपास पथकातील पोलिस नाईक आण्णासाहेब दातीर, पोलिस नाईक फुरकान शेख, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर यांनी सापळा रचून संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय २० वर्षे गुंजाळवाडी, शिवार ता. संगमनेर) सागर बाळू गायकवाड (रा. साठेनगर, घुलेवाडी, संगमनेर) यांना एका हिरो होन्डा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल सह पकडले. त्यांच्याशी पोलिसी पद्धतीने विचारपुस करता त्यांनी त्यांचे इतर साथीदार निखिल विजय वाल्हेकर (गुंजाळवाडी शिवार, संगमनेर) कपिल देविदास साठे, (वय १९ वर्षे, रा. साठेनगर, घुलेवाडी, ता. संगमनेर) यांनी संगनमताने चोऱ्या केल्या बाबत सांगीतले आहे.

तसेच चोरी केलेले लॅपटॉप, एल.सी.डी. टि.व्ही. हे त्यांचा मित्र अक्षय लहानु जाधव (रा. निमज ता. संगमनेर हल्ली रा. बटवाल मळा, संगमनेर) याच्या मार्फत विक्री केल्या बाबत सांगीतले.
तसेच संगमनेर औद्योगिक वसाहत परिसरातून चोरी केलेल्या बॅटऱ्यांची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यात मिळून आलेली मोटार सायकल हिरो होन्डा स्प्लेंडर क्र – एम.एच. १७ झेड ०६६२ हि संगमनेर शहरातील पेटीट सर्कल येथुन चोरी केल्या बाबत सांगीतले.
सागर बाळु गायकवाड (रा. साठेनगर, घुलेवाडी, संगमनेर) व अक्षय लहानु जाधव (वय २८ वर्षे, रा. निमज ता. संगमनेर हल्ली रा. बटवाल मळा, संगमनेर) यांनाही पोलिसांनी पकडले.

त्याबाबत गुन्हे अभिलेख तपासले असता वरील आरोपींनी दिलेल्या माहिती वरुन खालील प्रमाणे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत.
1) संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 600/2021 भा.द.वि.कलम 379,34
2) संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 61/2022 भा.द.वि.कलम 379
3) संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 71/2022 भा.द.वि.कलम 379
4) संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 93/2022 भा.द.वि.कलम 379
तसेच यातील मुख्य आरोपी संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर हा संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 515/2021 भा.द.वि.कलम 457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यात यापुर्वी फरार होता. आरोपी निखिल विजय वाल्हेकर यास संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 87/2022 भा.द.वि.कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
नमुद आरोपी यांचेकडुन 1) एक लिनिओ कंपनीचा लॅपटॉप 2) एक एसुस कंपनीचा लॅपटॉप 3) एक टी.सी.एल. कंपनीचा 32 इंची एल.ए.डी. टी.व्ही. व 4) एक एच.ओ.एम. कंपनीचा 32 इंची एल.ए.डी. टी.व्ही. 5) एक हिरो होन्डा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्र -एम.एच. 17 झेड 0662 असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असुन तो पुढील कार्यवाही कामी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.

मुख्य आरोपी संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 135/2021 भा.द.वि.कलम 379
2) संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 131/2021 भा.द.वि.कलम 457,454,380
3) संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 1963/2020 भा.द.वि.कलम 454,457,380
आरोपी अक्षय लहानु जाधव याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 487/2021 भा.द.वि.कलम 379 याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस नाईक ज्ञानेश्वर सोनवणे हे करत आहेत.

8766866561 mazi bike sangamner MIDC madhun geleli ahe ani maz kade CCTV footage pan ahe I think 💯 yatla person ahe to please update my information