मेंढपाळांच्या पालावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी दिनांक 16
गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी मेंढपाळांच्या पालावर दरोडे टाकणाऱ्या टोळीला पकडले आहे. या टोळीकडून सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच आरोपींना अटक केली आहे.


1) भैय्या कडु काळे, (वय 18, रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) 2) ताराचंद विरूपन भोसले, (वय 35, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) 3) किसन उर्फ विजय गौतम काळे, (वय 23, रा.पानसवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर) 4) नागेश विरूपन भोसले, (वय 20, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) 5) सोनुल लक्षरी भोसले, (वय 19, रा.बिडकीन, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, अरूण गांगुर्डे, भगवान धुळे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, भगवान थोरात, भाऊसाहेब काळे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे या पथकाने ही कारवाई केली आहे.

ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार 6) बदाम कडू काळे, (रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर (फरार) 7) रघुवीर विरूपन भोसले, (रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर (फरार) 8) महेश नंदु काळे, (रा.खोसपुरी, ता.अहिल्यानगर (फरार) या सर्वांनी मिळून अहिल्यानगर जिल्हयातील विळद गावातील डोंगर माथ्यावर असलेल्या मेंढपाळाच्या पालावर पाच ते सहा दिवसापुर्वी रात्रीच्या वेळी महिला व पुरूषांना मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगीतली. पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून 3 लाख 4 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, चार मोबाईल व दोन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात आणखी कोठे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत विचारपूस केली असता आरोपीतांनी मागील 10 ते 15 दिवसापुर्वी मांजरी शिवार, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर मेंढपाळाच्या पालावर रात्रीचे वेळी मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगीतली. त्यावरून गंगापूर पोलीस स्टेशनचे अभिलेखाची पडताळणी करून खालीलप्रमाणे दरोडयाचा गुन्हा उघडकीस आला आहे.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर 227/2025 बीएनएस कलम 310 (2)
ताब्यातील आरोपीतांना एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरनं 447/2025 या गुन्हयाचे तपासकामी मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात असून गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
