प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले !   सहा जणांवर गुन्हा दाखल

40 ब्रास वाळू सह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त 

संगमनेर तालुक्यातील दिनांक 13 

संगमनेर शहर आणि तालुक्यात आढळला म्हाळुंगी मुळा प्रवरा नद्यातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू असते. वेळोवेळी ही वाळू तस्करी करणाऱ्यांवर छापे घालून गुन्हे दाखल करण्यात येतात. तरीही वाळू तस्करी थांबत नाही. शहरा नजीक असणाऱ्या खांडगाव शिवारात अशीच वाळू तस्करी करणाऱ्या वाळू तस्कराला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले असून 40 ब्रास वाळू साठ्यासह दोन पिकअप वाहने घेऊन सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद कारभारी गुंजाळ, गणेश बलोडे, सुनील बोऱ्हाडे, बबलू सातपुते, लहानु बलोडे, निकुंज सुधीर ढोले या सहा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये दोन विनाक्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप टेम्पो तसेच 3500 रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू आणि 2 लाख 80 हजार रुपये किमतीचा 40 ब्रास वाळू साठा असा एकूण 5 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याचा पंचनामाही करण्यात आला आहे.

प्रवीण शशिराव डहाके (तलाठी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, खांडगाव येथील प्रवरा नदी पात्रात वाळू चोरी होत असल्याची खबर मिळाल्यानंतर खांडगावच्या ओढ्यात एका पिकअप गाडीमधून वाळू चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. सदर गाडीवाल्याला थांबवून गाडीची पाहणी केली असता त्यात अर्धा ब्रास वाळू आढळून आली आणि सदर चालकाचे नाव निकुज सुधीर ढोले असल्याचे समजले.

त्यानंतर अधिक माहिती घेतली असता सदर वाळू ढोले याने प्रवरा नदी पात्रातून घेतली असल्याचे सांगितले. त्यामुळे महसूलचे पथक प्रवरा नदी पात्रात गेले असता त्या ठिकाणी वाळूचा साठा करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. हा वाळूचा साठा वरील इतर पाच आरोपींचा असल्याची माहिती ढोले यांनी दिली. तसेच वाळूच्या साठ्याजवळ एक पिकअप असल्याचे देखील दिसून आले. मात्र कारवाई सुरू असताना नदीपात्रात अंधार झाल्यावर सदर पिकअप चालक निकुज सुधीर ढोले हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. असे फिर्यादीत म्हटले आहे.

वाळू तस्करी करणारे दोन्ही पांढऱ्या रंगाचे विना क्रमांकाचे पिकअप टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून चाळीस ब्रास वाळू महसूल विभागाच्या ताब्यात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल डुंबरे या करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!