हातभट्टी दारू अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापे !
475 लिटर गावठी हातभट्टी दारू / 3250 लिटर कच्चे रसायन नष्ट
प्रतिनिधी दिनांक 30
अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मोहीम स्थानिक गुन्हे शाखेकडून चालूच असून सात ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू बनवायच्या अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलेली आहे.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखाव तपास पथकातील पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, विश्वास बेरड, अरूण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे व चंद्रकांत कुसळकर असे पथक तयार करून अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते.

दिनांक 29/05/2025 रोजी पथकाने नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गावठी हातभट्टी अड्डयांची माहिती घेऊन छापे टाकून कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 7 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 2 लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं जप्त मुद्देमाल मुद्देमाल किंमत
1 नगर तालुका 468/2025 40 लि.हातभट्टी दारू व 250 लि.कच्चे रसायन 16,500/-
2 नगर तालुका 469/2025 70 लि.हातभट्टी दारू व 500 लि.कच्चे रसायन 33,000/-
3 नगर तालुका 470/2025 80 लि.हातभट्टी दारू व 400 लि.कच्चे रसायन 28,000/-
4 नगर तालुका 471/2025 90 लि.हातभट्टी दारू व 700 लि.कच्चे रसायन 43,000/-
5 नगर तालुका 472/2025 65 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 21,500/-
6 नगर तालुका 473/2025 70 लि.हातभट्टी दारू व 600 लि.कच्चे रसायन 37,000/-
7 नगर तालुका 474/2025 60 लि.हातभट्टी दारू व 500 लि.कच्चे रसायन 31,000/-
