गावठी पिस्तुलासह दोघेजण पकडले…
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 29
संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहर पोलिसांनी सापळा रचून गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पकडले असल्याची माहिती पोलिस स्टेशनने प्रयत्न द्वारे दिली आहे.

शेख मुजम्मिल शेख माजी (वय 22 वर्षे राहणार वाणी मुसलमान बौद्ध वाडा, जमुना, तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा) जमीर खान नजरखान (वय 40 वर्षे राहणार मिलन कॉलनी, तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा) अशी नावे असलेल्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल रामकिशन मुखरे, अतुल ऊंडे, अजित कुऱ्हे, संतोष भास्कर, साईनाथ पवार यांच्या पथकाने घुलेवाडी कडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून वरील दोघांना पकडले आहे.

अटक केलेल्या आरोपीकडून सिल्वर रंगाचे गावठी पिस्तूल आणि मोबाईल असा एकूण 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
