दरोडे आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडले !

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

 प्रतिनिधी दिनांक 26 

घरफोडी आणि दरोड्यातील आरोपी स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून एक लाखापेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पाच घरफोड्यांची उकल करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज लातुरकर, प्रशांत राठोड व मेघराज कोल्हे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलीस पथक वर नमूद घरफोडीच्या गुन्ह्याच्या गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा राजेश अशोक काळे, (रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर) याने त्याच्या साथीदारासह केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली. पथकाने आरोपीच्या घरी जाऊन शोध घेऊन 1) राजेश अशोक काळे, (वय 24, रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने मागील चार ते पाच दिवसापुर्वी भोरवाडी शिवारात 2) राहुल चंदर भोसले, (रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर (फरार) व 3) प्रदीप उर्फ खुटल्या आरकास काळे, (रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर (फरार) यांच्या सह केल्याची माहिती सांगीतली.

तसेच आरोपी काळे याने वरील साथीदारासह निघोज, राळेगणसिध्दी, चिंचोली, वाडेगव्हाण ता.पारनेर व शिर्डी येथील घरफोडीचे गुन्हे केल्याची सांगीतलेल्या माहितीवरून, पोलीस स्टेशनचे अभिलेख पडताळणी करून खालीलप्रमाणे घरफोडीचे 05 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1 पारनेर 322/2025 बीएनएस 331 (4), 303 (2)

2 पारनेर 316/2025 बीएनएस 303 (2)

3 पारनेर 291/2025 बीएनएस 331 (4), 305

4 सुपा 15/2025 बीएनएस 331 (4), 305 (अ)

5 शिर्डी 464/2024 बीएनएस 331 (4), 303

ताब्यातील आरोपीकडे घरफोडी गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले दागीने हे बाबा किसन शेंडगे, (रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा) यास विक्रीसाठी दिल्याची माहिती सांगीतली.त्यावरून पथकाने नमूद आरोपीचा शोध घेऊन बाबा किसन शेंडगे, (वय 60, रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) यास ताब्यात घेऊन 1लाख 19 हजार रू किंमतीचे त्यात 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त केले आहेत. तसेच इतर चोरीचे सोन्याचे दागीने हे (बेलवंडी, ता.श्रीगोंदा) येथील सोनारास विक्री केल्याची माहिती सांगीतली.

ताब्यातील आरोपी राजेश अशोक काळे याचेवर दाखल गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता तो खालीलप्रमाणे दरोडा व घरफोडीच्या गुन्हयात फरार असल्याचे निष्पन्न झाले.याबाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1 चाकण पोलीस स्टेशन 719/2024 बीएनएस 310(2), 311

2 शिक्रापुर पोलीस स्टेशन 310/2024 भादंविक 396

3 चाकण पोलीस स्टेशन 81/2025 बीएनएस 331(4), 305 (अ)

4 चाकण पोलीस स्टेशन 503/2024 बीएनएस 331(4), 305 (अ)

5 चाकण पोलीस स्टेशन 597/2024 बीएनएस 331(4), 305 (अ)

6 चाकण पोलीस स्टेशन 131/2024 भादंविक 454, 457, 380

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!