युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शिवसेना युवा सेनेच्या वतीने वृक्षरोपण 

  संगमनेर प्रतिनिधी दिनांक 14

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगमनेर शहर शिवसेना व युवासेना यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अहमदाबाद येथील विमान दुर्घटने मुळे आदित्य साहेब ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे शिवसेना युवा सैनिकांना आवाहन केले त्यामुळे संगमनेर युवा सेनेच्या वतीने कोणताही गाजावाजा न करता तसेच कोणतेही फ्लेक्स बाजी बॅनरबाजी न करता वृक्ष लागवड व संवर्धन हेतूने झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यासाठी हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान मंदिर परिसरात वड पिंपळ लिंब व इतर प्रकारची झाडे लावण्यात आली व ठाकरे यांचा वाढदिवस करण्यात आला युवा सेना विस्तारक मितेशजी साटम यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण जिल्हा समन्वयक फैसल सय्यद यांनी दिली.

यावेळी शिवसेना माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भाऊसाहेब हासे, पप्पू कानकाटे, भीमाशंकर पावसे, योगेश खेमनर, इम्तियाज शेख यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी संभव लोढा, वैभव अभंग, सागर भागवत, पंकज पडवळ, सचिन साळवे, राजाभाऊ सातपुते, अमोल डुकरे, प्रकाश गायकवाड, अशोक लक्ष्मण पावसे, संपत केशव पावसे, यादव त्र्यंबक पावसे, रामनाथ शिंदे, गणेश शिंदे, भाऊसाहेब पावसे, संदीप टेमगिरे, छगन भालेराव, समाधान भालेराव, नितीन भालेराव, खंडू बोराडे, सिताराम गडाख, आदी नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!