पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त शहरात स्वच्छता अभियान !
संगमनेर भाजपचा उपक्रम
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 24
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी ३०० वी जयंती समारोह सप्ताह निमित्त संगमनेर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने २४ मे रोजी शहरातील गणेश नगर महादेव मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, यावेळी भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर मंडलाच्या वतीने शहराध्यक्षा पायल आशिष ताजणे यांच्या समवेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मंदिराची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविले व महाआरती करण्यात आली.


पायल ताजणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना भारताचा वारसा, संस्कृती आणि सामर्थ्य समृद्ध करण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे खूप मोठे योगदान लाभले आहे. अहिल्यादेवींचे सुशासन, मंदिरांचा जिर्णोद्धार व महिला सक्षमीकरणाचे कार्य लोकोत्तर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

पुढे बोलताना म्हटले आहे की, दूरदर्शी प्रशासक म्हणून अहिल्यादेवीनी जमीन महसूल व्यवस्थापनाची प्रक्रिया सुलभ केली. त्यांच्या प्रशासन निष्पक्षता, न्याय आणि प्रजेबद्दलच्या कर्तव्याच्या भावना उदार होत्या. महिलांच्या हक्कांसाठी व सामाजिक-आर्थिक उन्नतीचे मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने परिस्थितीत लक्षणीय बदल होत असून सर्वत्र महिलांचे प्रतिनिधीत्व वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी चें समर्पण वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच मंदिरांची पुनर्बांधणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या थोर समाजसुधारक होत्या. माळवा प्रांतात सती प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. वाईट प्रथा मोडीत काढत त्यांनी मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याचे धाडसी पाऊल उचलले. विधवांना मालमत्तेत हक्क दिला असल्याचेही ताजणे यांनी म्हटले आहे.

यावेळी राम जाजू, ज्ञानेश्वर कर्पे, राजेंद्र सांगळे, दिपक भगत, सिताराम मोहरीकर, दिनेश सोमाणी, भारत गवळी, दिलीप रावल, सुधाकर गुंजाळ, हरीश चकोर, अरुण कुलकर्णी, भाऊ जाखडी, वैभव लांडगे, कल्पेश पोगुल, आशिष ताजणे, कैलास भरीतकर, अनुराग ताजणे, संतोष पठाडे, श्रीकांत कासट, दीपेश ताटकर, अमोल रनाते, प्रेम भालसिंग, विशाल येनगंदूल, पांडुरंग शेराल, रवी उडता, श्रीनिवास वलूसा, सुदर्शन इटप, शुभम कोकणे, मेघा भगत, ज्योती भोर, कांचन ढोरे, अरुणा पवार, सुरेखा खरे, अंजना भालसिंग, रेश्मा खांडरे, मधुरा पोळ, ॲड. गोरक्ष कापकर, योगेश लष्करे, हर्षवर्धन खुळे, श्याम कोळपकर, मनिषा शिंदे, संतोष डोगंरे, यासंह संगमनेर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
