सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार !

आमदार अमोल खताळ यांचा इशारा 

घरेलू कामगार योजनेअंतर्गत महिलांना साहित्य वाटप

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 7 —

महायुती सरकारची सर्वसामान्य घरेलू कामगारांसाठीची योजना मोफत आहे. मात्र तालुक्यात काही दलालाकडून लाभर्थीची दिशाभूल सुरू असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. कोणत्याही योजनांसाठी पैसे देवू नका. पैसे घेवून लाभार्थीची आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.

महायुती सरकारने घरेलू कामगार महीलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील महीला लाभार्थीना साहीत्याचे वाटप आमदार खताळ यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, विनोद सूर्यवंशी, शिवसेना महिला जिल्हा उपाध्यक्ष दिपाली वाव्हळ, भाजप शहर अध्यक्षा पायल ताजणे, तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, रेखा गलांडे यांच्या सह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, महायुती सरकारने सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून योजनांचे निर्णय केले. त्याची अंमलबजावणी राज्यात यशस्वीपणे सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहेत. घरेलू कामगार योजने साठी नाव नोंदणी करताना मोफत नोंदणीसाठी कॅम्पचे आयोजन केले होते. परंतू काही दलालांनी महीलांकडून पैसै घेतल्याच्या तक्रारी आल्या. त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

तालुक्यात महायुती सरकारला बदनाम करण्याचे काम काही मंडळीकडून होत असून, लोकांकडे आता माहीती आणि आधार कार्ड नंबर मागितले जात आहेत. कोणालाही व्यक्तिगत माहीती, आधारकार्ड नंबर देवू नका असे आवाहन करून कोणत्याही योजनेसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. पालकमंत्री कार्यालय तसेच माझे संपर्क कार्यालय जनतेसाठी सूरू असून तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येवून योजनासाठी नोंदणी करावी. शासकीय कार्यालयात कोणी पैसे मागत असतील तर आमच्याकडे तक्रारी करा असेही खताळ यांनी सूचित केले. सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व एस. आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर व विविध दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप या योजनांतर्गत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे 13 जुलै 2025 रोजी अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा. आमदार अमोल खताळ, संगमनेर

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!