पेहलगाम दहशतवादी हल्ला ! 

संगमनेर मुस्लिम समाजाचे निषेध आंदोलन –

 संगमनेर प्रतिनिधी दिनांक 23 

जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत संगमनेर मुस्लिम समाजाच्यावतीने सय्यद बाबा चौक येथे शांततेत आंदोलन करण्यात आले.

या वेळी शहर काजी पिरजादा सय्यद अब्दुल रकीब कादरी यांनी सांगितलं की,”ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. आम्ही या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. दोषींना तात्काळ पकडून फाशी दिली जावी. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना विनंती करतो की, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर निर्णय घेऊन उदाहरणात्मक शिक्षा द्यावी.”

मुफ्ती सलमान यांनी सरकारकडे मागणी करत म्हटलं की,”या हल्ल्याची पारदर्शक चौकशी व्हावी. हे केवळ धर्मांमध्ये फूट पाडण्याचं षड्यंत्र आहे. आपण सर्वांनी एकतेने या हिंसेला नकार द्यायला हवा.”

या प्रसंगी झमिल कादरी यांनीही रोष व्यक्त करत स्पष्ट शब्दांत सांगितलं की,”हा हल्ला नपुंसक आणि भ्याड मानसिकतेतून केला गेला आहे. हे पाकिस्तानसारख्या देशाचं कृत्य असू शकतं, कारण त्यांना कधीच भारतात आणि विशेषतः काश्मीरमध्ये होणारी प्रगती सहन होत नाही. आज काश्मीरमध्ये मुलं शिक्षण घेत आहेत, रोजगार मिळवत आहेत, टुरिझम वाढतो आहे – ही एकता आणि विकास पाकिस्तानला खटकतो आहे आणि म्हणूनच अशा दहशतवादी कारवाया होत आहेत.”

सदर निषेध आंदोलन सय्यद बाबा दर्ग्याच्या समोर पार पडले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!