सर्वोच्च शिखर कळसुबाई येथे रोप-वे चे सर्वेक्षण सुरू होणार !

राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

प्रतिनिधी —

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, तसेच महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर पर्यटकांना जाण्यासाठी आता रोप-वे ची सुविधा लवकरच होणार असून यासाठी सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचे आदेश राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

कळसुबाई येथे रोप-वेची सुविधा करण्याबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.


यावेळी अकोल्याचे आमदार किरण लहामटे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन सह संचालक  धनंजय सावळकर व पर्यटन विभागाच्या उप सचिव आदी बैठकीस उपस्थित होते.

ट्रेकर्सची कायम पसंती असलेले महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळख असलेल्या कळसुबाई शिखरावर सर्वसामान्यांना पोहचता यावे यासाठी रोप-वेची सुविधा करण्याबाबत सविस्तर माहिती व आश्यकता आणि गरज याबाबत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बाजू मांडली.

आदिवासी भागात पर्यटन विकासाबरोबरच आदिवासींना रोजगार उत्पन्न होण्याचे साधन रोप-वे च्या माध्यमातून निर्माण होईल. पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. अशा विविध सूचना लहामटे यांनी केल्या.

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे येणाऱ्या पर्यटकांना कळसूबाई शिखर गाठता यावे यासाठी रोप-वे बनविण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण अहवाल करण्याबाबत सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या व रोप-वेमुळे भविष्यात वाढणाऱ्या संभाव्य पर्यटक संख्येबाबत सविस्तर माहितीसह अहवाल सादर करण्याबाबत निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!